Prabha Atre : भारतीय संगीत क्षेत्राचे क्षितीज उजळवून टाकणारी प्रभा निमाली; प्रभा अत्रे यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातही शोककळा
Prabha Atre : प्रभा अत्रे यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. संगीतासह राजकीय क्षेत्रातूनही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे.
Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे (Prabha Atre) यांचे निधन झाले आहे. प्रभा यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातूनही शोक व्यक्त केला जात आहे. भारतीय संगीत क्षेत्राचे क्षितीज उजळवून टाकणारी प्रभा निमाली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले आहे. तसेच त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) श्रद्धांजली वाहत म्हणाले,"स्वरयोगिनी, संगीत विचारवंत , लेखिका अशी बहुआयामी ओळख असलेल्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने एक स्वरतपस्वी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या होत्या. केंद्र सरकारने त्यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल 1990 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. 2022 मध्ये पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शास्त्रीय संगीत परंपरेच्या त्या महत्वाच्या दुवा होत्या. संगीताचा ध्यास घेऊन त्यासाठी जीवन अर्पण करणाऱ्या डॉ. प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली".
स्वरयोगिनी, संगीत विचारवंत , लेखिका अशी बहुआयामी ओळख असलेल्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने एक स्वरतपस्वी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या होत्या. केंद्र सरकारने… pic.twitter.com/Dpk6HosOJf
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 13, 2024
शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत : उपमुख्यमंत्री अजित पवार
"ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या निधनाने ज्ञान, विज्ञान, विधी, कला, साहित्य, संगीत अशा अनेक क्षेत्रात सर्वोच्च कर्तृत्व गाजवणारं प्रतिभावंत व्यक्तिमत्वं हरपलं आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत झाला आहे. डॉ. प्रभाताई अत्रे यांनी आठ दशकांहून अधिक काळ आपल्या अप्रतिम गायनानं भारतीय संगीतक्षेत्र समृद्ध केलं. कोट्यवधी रसिकांची मन जिंकली. ठुमरी, दादरा, गझल, भजन, भावसंगीत, नाट्यसंगीत, उपशास्त्रीय संगीतासारख्या गायकीतून गानरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. पुण्यात जन्मलेल्या डॉ. प्रभाताई महाराष्ट्रासाठी, देशासाठी, जागतिक संगीतक्षेत्रासाठी भूषण होत्या. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरवलेल्या डॉ. प्रभाताई अत्रे यांचे निधन ही देशाच्या संगीत, कलाक्षेत्राची फार मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो", अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या निधनानं ज्ञान, विज्ञान, विधी, कला, साहित्य, संगीत अशा अनेक क्षेत्रात सर्वोच्च कर्तृत्व गाजवणारं प्रतिभावंत व्यक्तिमत्वं हरपलं आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत झाला आहे. डॉ. प्रभाताई अत्रे यांनी आठ दशकांहून… pic.twitter.com/dkryBI3d90
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 13, 2024
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शोक व्यक्त करत पुढे म्हणाले,"ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभाताई अत्रे यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारे आहे. किराणा घराण्याच्या गायिका प्रभाताई अत्रे यांनी शास्त्रीय गायनातून देशभरातील रसिक नुसता मंत्रमुग्ध केला नाही, तर तो अधिक समृद्ध केला. ठराविक पठडीच्या बाहेर जाऊन गायनासाठी त्या ओळखल्या जात. नाविन्य हे त्यांच्या गायनशैलीचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या स्वरांना तप:श्चर्येचे बळ होते. केवळ गायन नाही तर आपले रसिक जाणकार असावेत, यासाठी त्यांनी लेखन सुद्धा केले. त्यांच्या संगीत सेवेसाठी त्यांना भारत सरकारने 'पद्मश्री', 'पद्मभूषण' आणि 'पद्मविभूषण' अशा तिन्ही पुरस्कारांनी गौरवान्वित केले".
भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी दिलेले योगदान शब्दात मांडणे अशक्य : देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले,"गेल्याच महिन्यात 25 डिसेंबर 2023 ला पुण्यात त्यांना अटल संस्कृती पुरस्कार प्रदान केला, तेव्हा तीच शेवटची भेट ठरेल, अशी कल्पनाही नव्हती. त्यांना भेटणं, त्यांचं गाणं ऐकणं ही कायम विलक्षण अनुभूती असायची. भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी दिलेले योगदान शब्दात मांडणे अशक्य आहे. प्रभाताईंनी भारतीय शास्त्रीय संगीताची सेवा करताना नव्या गायक-गायिकांना घडविण्याचे कार्य केले. भारतीय संगीत त्यांचे कायम ऋणी राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि चाहत्यांना लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो".
संबंधित बातम्या