एक्स्प्लोर

Vatsala Deshmukh : जेष्ठ अभिनेत्री वत्सला देशमुख काळाच्या पडद्याआड, ‘पिंजरा’ चित्रपटात साकारली होती खलनायिका

Vatsala Deshmukh Passes away : अभिनेत्री वत्सला देशमुख यांनी त्यांच्या प्रदीर्ष नाट्य आणि सिनेसृष्टीच्या प्रवासाने एक काळ गाजवला होता.

Vatsala Deshmukh Passes away : मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्व गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख (Vatsala Deshmukh) यांचे आज निधन झाले. मराठीतील प्रसिद्ध दिवगंत अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या त्या आई होत्या. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. वत्सला देशमुख यांनी त्यांच्या प्रदीर्ष नाट्य आणि सिनेसृष्टीच्या प्रवासाने एक काळ गाजवला होता.

‘पिंजरा’ या सिनेमात त्यांनी खलनायिकेची भूमिका साकारली होती. त्यांची ती भूमिका विशेष गाजली होती. अनेक सिनेमात वत्सला यांनी प्रमुख अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री म्हणून भूमिका निभावल्या आहेत. आई, काकू, मावशी, आत्या, आजी अशा अनेक भूमिकेतून वत्सला देशमुख प्रेक्षकांच्या मनामनात वसल्या होत्या.

‘पिंजरा’तील संवाद लोकप्रिय!

‘काय म्हणावं या मास्तरला, डोस्कं बिस्कं फिरलया का अक्कल गहाण ठिवून आलायसा, काय म्हणते मी, नीट गुमान राव्हायचं असलं तर राव्हा, नाहीतर चालू पडा’, हा पिंजरा सिनेमातील त्यांचा संवाद चांगलाच गाजला होता.

मनोरंजनविश्वाची कौटुंबिक पार्श्वभूमी

वत्सला देशमुख यांच्या कुटुंबातील अनेक जण मनोरंजनविश्वाशी निगडीत होते. त्यांचे वडील श्रीधरपंत देशमुख हे बापुराव पेंढारकर यांच्या ‘ललितकलादर्श’ कंपनीत काम करत होते. वत्सला यांची बहिण प्रसिद्ध अभिनेत्री संध्या या देखील सिनेसृष्टीत कार्यरत होत्या. तर, त्यांची मुलगी रंजना यांनी देखील मराठी सिनेसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे. अभिनेत्री रंजना यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. फार कमी वयात रंजना यांनी या जगाचा निरोप घेतला होता.

एका प्रसिद्ध दैनिकाला दिलेल्या एका मुलाखतीत वत्सला देशमुख म्हणाल्या होत्या की, ‘राजकारण हा माझा आवडीचा विषय आहे.’ काही महिन्यांनपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या टीव्ही कार्यक्रमात त्या तब्बल सोळा वर्षांनी कॅमेरासमोर आल्या होत्या. स्वतः चित्रपटविश्वात सक्रिय असणाऱ्या वत्सला या मालिकांमध्येही रमायच्या. ‘जय मल्हार’ ही त्यांची आवडती मालिका होती. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Katrina Kaif Body Shaming Troll: प्रेग्नेंसीनंतर विकी कौशलसोबत दिसताच कटरिनाचं सोशल मीडियावर प्रचंड 'बॉडी शेमिंग', पहिल्यांदाच मौन सोडत म्हणाली...
प्रेग्नेंसीनंतर विकी कौशलसोबत दिसताच कटरिनाचं सोशल मीडियावर प्रचंड 'बॉडी शेमिंग', पहिल्यांदाच मौन सोडत म्हणाली...
Radhika Apte: आधी ॲक्शन सीनमध्ये बटन न लावण्याची विचित्र मागणी, नंतर इनरवेअरमध्येच..; राधिका आपटे इंटिमेट सीनवर बेधडक बोलली, म्हणाली...
आधी ॲक्शन सीनमध्ये बटन न लावण्याची विचित्र मागणी, नंतर इनरवेअरमध्येच..; राधिका आपटे इंटिमेट सीनवर बेधडक बोलली, म्हणाली...
Arbaz Shaikh On Tukaram Mundhe: 'थँक्यू सो मच तुकाराम मुंढे साहेब...', 'सैराट' फेम अभिनेत्यानं मानले आभार, नेमकं घडलं काय?
'थँक्यू सो मच तुकाराम मुंढे साहेब...', 'सैराट' फेम अभिनेत्यानं मानले आभार, नेमकं घडलं काय?
Censor Board Guidelines:35 वर्षांनंतर सेन्सॉर बोर्डाच्या नव्या गाईडलाईन्स; आता 'हे' सीन्स दाखवताना द्यावी लागणार वॉर्निंग; बोर्डावर आता चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश
35 वर्षांनंतर सेन्सॉर बोर्डाच्या नव्या गाईडलाईन्स; आता 'हे' सीन्स दाखवताना द्यावी लागणार वॉर्निंग; बोर्डावर आता चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश

व्हिडीओ

Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Disha Salian Case: आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
आम्ही मातोश्रीवर येऊन नोटीस दिली, कोणी काहीही वाकडं करु शकलं नाही; सतीश सालियन यांच्या वकिलांनी डिवचलं
'मोहम्मद शमीचा भाऊ नवऱ्यासारखा माझ्यासोबत राहत होता, आयपीएलमध्ये निवड होताच..' FIR करणारी महिला काय काय म्हणाली?
'मोहम्मद शमीचा भाऊ नवऱ्यासारखा माझ्यासोबत राहत होता, आयपीएलमध्ये निवड होताच..' FIR करणारी महिला काय काय म्हणाली?
Dattatray Bharne Farmers: कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
Pune Crime News: शटर तोडले, लाॅकर फोडले! भांडारकर रोडवरील साडीच्या शोरूममध्ये चोरी; सीसीटीव्ही फुटेज आले समोर
शटर तोडले, लाॅकर फोडले! भांडारकर रोडवरील साडीच्या शोरूममध्ये चोरी; सीसीटीव्ही फुटेज आले समोर
Embed widget