एक्स्प्लोर

Vaibhav Mangle In Hindi Language Compilation: मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलीय; कशी? वैभव मांगलेंनी उदाहरणासह स्पष्टच सांगितलं

Vaibhav Mangle In Hindi Language Compilation: उर्वरीत महाराष्ट्राचं मला माहीत नाही . पण मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलीय, असं वैभव मांगले त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

Vaibhav Mangle In Hindi Language Compilation: यंदाचं शैक्षणिक वर्ष (Academic Year) सुरू झाल्यापासून राज्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटलाय. पहिलीपासून हिंदी सक्तीची (Hindi Language) करण्याचा जीआर राज्य सरकारनं (Maharashtra Government) तीव्र विरोधामुळे मागे घेतला होता. पण आता नवा जीआर काढलाय. त्यात हिंदी सक्तीची नसली तरी पहिलीपासून त्रिभाषा सूत्र राबवण्यात आलंय. त्यामुळे राज्य सरकारनं मागच्या दारानं हिंदी सक्तीची केल्याचा आरोप केला जात आहे. याला राज्यभरातून विरोध केला जात आहे. तसेच, अनेक राजकीय पक्षांनी याविरोधात भूमिका जाहीर केली आहे. अशातच अनेक मराठी सेलिब्रिटी आणि अनेक राजकीय नेत्यांनी यावर वक्तव्य केलं आहे. अशातच मराठी रंगभूमी, मराठी सिनेविश्व आणि मराठी मालिका विश्वातील नावाजलेले अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनीही हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर वक्तव्य केलं आहे. याबाबत त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर वक्तव्य केलं आहे. 

अभिनेते वैभव मांगले यांनी फेसबुकवर भलीमोठी पोस्ट करुन हिंदी भाषा सक्तीला विरोध दर्शवला आहे. तसेच, त्याबाबत सविस्तर उदाहरणं देत स्पष्टीकरणंही दिलं आहे. वैभव मांगले काय म्हणाले सविस्तर पाहुयात... 

फेसबुक पोस्टमध्ये वैभव मांगले नेमकं काय म्हणाले? 

मराठी अभिनेते वैभव मांगले म्हणाले की, "उर्वरीत महाराष्ट्रच मला माहीत नाही . पण मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलेली आहे .. कामाच्या ठिकाणी सतत हिंदी किंवा इंग्रजी बोलाव लागत हा एक भाग. दुसरं म्हणजे आपल्या आपल्यात सुद्धा त्यांना मराठी बोलायची लाज वाटते. आप ली  मुलं चांगल मराठी बोलायचं विसरून गेली आहेत. त्यात हिंदीची सक्ती केली तर संपलच सगळं मातृभाषेची (मुळात आई मराठी बोलत असले तर) भिकारणीची अवस्था होईल."
 
आता तर खेडो पाडी इंग्रजी शाळा झाल्या आहेत . मुंबई पुणे येथे अनेक शाळा मध्ये मराठी शिकवीत नाहीत . मुलांशी घरात इंग्रजी बोला सांगतात. आई बाबा ला धड इंग्रजी येत नाही .. शाळेत शिक्षकांचं जे ऐकतील ते (शिक्षक तरी  किती चांगलं बोलतील) त्यामुळे धड इंग्रजी नाही धड मराठी नाही .. त्यात बोली भाषा वेगवेगळ्या , पुन्हा शाळेत प्रमाण भाषा शिका . त्याचा वेगळा ताप . आई खिमट म्हणते आणि शाळेत मऊभात म्हणा म्हणतात... मी उबारलायस म्हणतो शाळेत उभा राहिला आहेस म्हणतात. माझ्या वांगडा चल म्हणतो तर शाळेत माझ्या बरोबर चल म्हणा म्हणतात. ही त्या बालमनाला संकट वाटतात. तर अजून हिंदी (राष्ट्रभाषा म्हणतात तिला) जोडीला आणून बसवली तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा.", असं वैभव मांगलेनं त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

"आपण आपल्या भाषेची कमालीची भीषण अवस्था केली आहे .तिच्या बद्दल कमालीचा अनादर आहे. आम्हाला तर सिरियल ला स्क्रिप्ट सुद्धा मराठीत देत नाहीत (अनेक ठिकाणी) तर इतर ठिकाणी जिथे हिंदी भाषिक इंग्रजाळलेले लोक आपली काय पत्रास ठेवतात ते आपण पाहतो आहोत .हिंदी पहिली पासून येईल न येईल हा माझ्या साठीच नंतरचा मुद्दा आहे .. येणार ही नाही कदाचित पण म्हणून आपलं मराठी भाषेबद्दलच प्रेम वाढणार आहे का ?? आपण आपल्या मुलांच मराठी चांगलं होण्यासाठी अधिक सजग होणार आहोत का ? मुळात आपण मराठीत बोलणार आहोत का ????", असं वैभव मांगले म्हणाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Singer Asha Bhosle On Ashish Shelar: राज-उद्धव एकत्र येण्याबाबत प्रश्न, आशाताई म्हणाल्या, 'मला फक्त आशिष शेलार माहितीयेत, बाकी कोणा राजकारण्याला ओळखत नाही'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
Sarangkheda Horse Vs Bullet Race: सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!

व्हिडीओ

Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
Davkhare vs Abitkar Thane : Aapla Dawakhana त साडीचं दुकान? डावखरेंच्या प्रश्नावर आबीटकरांचं उत्तर
Ambadas Danve on Cash Bomb : पैशांच्या गड्ड्यांसह सत्ताधारी आमदार, दानवेंचा 'कॅश बॉम्ब'
Bharatshet Gogawale On Danveपैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडीओ दानवेंकडून ट्विट,गोगावले म्हणाले..
Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sarangkheda Horse Market: सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
सारंगखेड्यात घोडा आणि बुलेटची शर्यत, वाऱ्याच्या वेगाने अश्व धावत सुटला, दोघांपैकी कोण जिकलं? पाहा PHOTO
Pune Crime News: मोठी बातमी : चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
चल तुला शाळेत सोडतो, पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
'त्या' दिवशी बीड जिल्हा बंद, राज्यात एकही चाक फिरणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मस्साजोगमधून इशारा
Sarangkheda Horse Vs Bullet Race: सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
सारंगखेड्यात रंगला घोडा Vs बुलेट शर्यतीचा थरार, ‘वेगवान राणी’ची धमाकेदार बाजी, अश्वप्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं!
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
जमिनीचा वाद पेटला, भर रस्त्यात आई-मुलाला गावगुंडांची अमानुष मारहाण, कुटुंब दहशतीत; बीडमधील धक्कादायक प्रकार
MNS Sandeep Deshpande Video: आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
आधी दानवेंनी शिंदे गटाच्या आमदाराला कोंडीत पकडलं, आता संदीप देशपांडेंनी लाचखोर PWD अधिकाऱ्याचा व्हिडीओ आणला समोर
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना झापलं, म्हणाले, 'लाडक्या बहि‍णींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल'
देवेंद्र फडणवीसांनी अभिमन्यू पवारांना झापलं, म्हणाले, 'लाडक्या बहि‍णींच्या विरोधात जाऊ नका, घरी बसावं लागेल'
Devendra Fadnavis: फलटणमध्ये आयुष्य संपवलेल्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूबाबत देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची माहिती, म्हणाले, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये...
फलटणमध्ये आयुष्य संपवलेल्या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूबाबत देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाची माहिती, म्हणाले, फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये...
Embed widget