एक्स्प्लोर

CoronaVirus Lockdown | प्रियांका चोप्रासह काही मराठी सेलिब्रिटीही युकेमध्ये अडकले

अभिनेत्री प्रियांका चोप्रा, आफताब शिवदासानी यांच्यासह आणखीही काही बॉलिवूड सेलिब्रिटी इथं कोरोनाच्या संकटामुळं लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत.

CoronaVirus Lockdown अर्थात नव्या कोरोना व्हायरसच्या प्रकारामुळं इंग्लंडमध्ये ओढावलेलं संकट आणि त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या सक्तीच्या लॉकडाऊनमुळं अनेक बडे सेलिब्रिटी तिथं अडकल्याचं वृत्त आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, आफताब शिवदासानी या बॉलिवूड सेलिब्रिटींचं परदेशात अडकल्याचं वृत्त समोर येत आहे.

'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता संतोष जुवेकरसुद्धा इंग्लंडमध्ये अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. पण, रिंकू काही दिवसांपूर्वीच भारतात परतल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिल्याचं कळत आहे. काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या नव्या विषाणूबाबत ब्रिटननं साऱ्या जगाला माहिती दिली. याबाबत दहशतीचं वातावरण असतानाच आता कोरोना विषाणूचा नव्यानं आणखी एक प्रकार समोर आल्यामुळं या दहशतीत भर पडली आहे.

नव्या विषाणूमुळं संसर्गाचं प्रमाण झपाट्यानं वाढण्याची भीती असल्यामुळं सदर भागात सक्तीचं लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहेत. ज्यामुळं कैक भारतीय सेलिब्रिटी इंग्लंडमध्ये अडकले आहेत.

भारतातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी सक्तीचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. ज्यावेळी कलाविश्वातील सर्व कामकाज पूर्णपणे ठप्प होतं. पण, लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता मिळताच या कामांना पुन्हा वेग आला. अनेक कलाकार पुन्हा चित्रीकरणांमध्ये व्यग्र झाले. ज्यामध्ये प्रियांका चोप्रा, आफताब आणि इतरही कलाकारांचा समावेश आहे. सध्या लॉकडाऊनच्या या कचाट्यात सापडलेल्या सेलिब्रिटींसमवेत त्यांच्या चित्रपटातील क्र्यू मेंबर्सही असल्याचं कळत आहे.

ग्रेट ब्रिटनमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचं अतिशय सक्तीनं पालन करण्यात येत आहे. त्यामुळं कलाकारांना परतीचे मार्ग सापडेनासे झाले आहेत.

काय म्हणाले ब्रिटनचे आरोग्यमंत्री?

ब्रिटनचे आरोग्यमंत्री हँकॉक यांनी बुधवारी कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबतची माहिती दिली. या व्हायरसचा नवा प्रकार अधिक वेगानं संसर्ग पसरवत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. मागील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतील आरोग्य विभागानं येत्या काही दिवसांमध्ये कोरोना संसर्गात वाढ होण्यास विषाणूचा हाच प्रकार कारणीभूत ठरु शकतो असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं.

कोरोना लसीत डुक्कराची चरबी असेल तर 'हराम', सरकारनं आधीच माहिती द्यावी- ऑल इंडिया सुन्नी जमीयत उलेमा

भारत सजग

इंग्लंडमध्ये नव्या कोरोनाची दहशत असण्याच्या पार्श्वभूमीवर इथं भारतातही या विषाणूच्या संसर्गाबाबत निरीक्षणांना वेग आला असून, आरोग्य यंत्रणा सजग झाल्या आहेत. अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्याचे नियम लागू करण्यात आले आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget