Vastraharan : मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटक 'वस्त्रहरण'; रंगणार 5255 प्रयोग
Vastraharan : 'वस्त्रहरण' या मराठी नाटकाचा 5255 प्रयोग लवकरच पार पडणार आहे.
Vastraharan Marathi Drama : 'वस्त्रहरण' (Vastraharan) हे मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटक (Marathi Natak) आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नाटकाचे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आतापर्यंत या नाटकाचे 5254 प्रयोग झाले असून लवकरच या नाटकाचा 5255 वा प्रयोग रंगणार आहे. 'वस्त्रहरण' हे अजरामर मराठी नाटक रंगभूमीवर दाखल झाल्याने नाट्यरसिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गेल्या 44 वर्षांपासून 'वस्त्रहरण' हे मराठी नाटक प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता या नाटकाच्या 44 वर्षाच्या निमित्ताने सेलिब्रिटी कलाकरांच्या संचात या नाटकाचे रंगभूमीवर 44 मोजकेच प्रयोग होणार आहेत. 16 फेब्रुवारी 1980 रोजी कै. मच्छिन्द्र कांबळी यांनी 'वस्त्रहरण' या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. या नाटकाचे इतिहास घडवला होता. आता या व्यावसायिक रंगभूमीवर इतिहास घडवणाऱ्या 'वस्त्रहरण' या अजरामर कलाकृतीची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.
View this post on Instagram
भद्रकाली प्रॉडक्शनने 'वस्त्रहरण' या नाटकाची निर्मिती केली आहे. 'वस्त्रहरण'च्या प्रयोगाबद्दल बोलताना भद्रकाली प्रॉडक्शनचे प्रसाद कांबळी म्हणाले,"आता सेलिब्रिटी कलाकारांच्या संचात 'वस्त्रहरण' या नाटकाचे 44 मोजकेच प्रयोग सादर होणार असून लवकरच 5255 प्रयोग रसिकांसमोर सादर होणार आहे".
मराठी माणूस आणि नाटक यांचं एक अजब असं मेतकूट आहे. ओटीटी, सिनेमे, वेबसीरिज अशा कितीही गोष्टी आल्या तरी नाटकाची जागा कोणीही घेऊ शकलेलं नाही. त्यामुळे प्रायोगिक रंगभूमीपासून व्यावसायिक रंगभूमीची क्रेझ नाट्यकर्मींसह नाट्यरसिकांमध्ये आजही कायम आहे. कोरोनानंतर आता पुन्हा एकदा मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारी, उत्कृष्ट दर्जाची मराठी नाटकं गेल्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. जुनी नाटकं नव्याने सादर करण्याचा प्रयत्न सध्या होत आहे. या नाटकांना नाट्यरसिकांचादेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोकणात दशावतारी नाटकांची क्रेझ
कोकण आणि दशावतार यांचं एक वेगळचं समीकरण आहे. गेल्या कित्येक दशकांपासून दशावतारी नाटकं, शिमग्यातील खेळ, सोंगे, भारुडे कोकणवासियांचं मनोरंजन करत आहेत. आजही कोकणवासियांमध्ये आणि कोकणातल्या कलाकारांमध्ये दशवतारी नाटकाची चांगलीच क्रेझ आहे. मराठी रंगभूमीवर आतापर्यंत शुद्ध मराठी भाषेतून येत असलेली मराठी नाटके रसिक प्रेक्षक चोखंदळपणे पाहत होता. पण कोकणात जन्मलेल्या एका मराठी मालवणी भाषित माणसाने मालवणी बोलिभाषेतून 'वस्त्रहरण' हे नवंकोर नाटक रंगभूमीवर आणून रंगमंच आणि रसिकांसाठी मनोरंजनाचे आगळेवेगळे नवे दालन उघडे केले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :