एक्स्प्लोर

Prasad Kambli : 'भद्रकाली'चं रंगभूमीवरून सीमोल्लंघन, प्रसाद कांबळींनी केली मोठी घोषणा

Bhadrakali Studios : भद्रकाली प्रोडक्शनने नाटकाकडून स्क्रीनकडे सीमोल्लंघन केलं आहे.

Prasad Kambli On Bhadrakali Studios : मराठी रंगभूमीवर वेगवेगळ्या धाटणीची नाटकं रसिकांच्या भेटीसाठी आणणाऱ्या भद्रकाली प्रोडक्शनने  सीमोल्लंघन केले आहे. भद्रकाली प्रोडक्शनने आता आपला मोर्चा वेब सीरिज, चित्रपट, मालिकांकडे वळवला आहे. त्यासाठी भद्रकाली स्टुडिओची घोषणा 'भद्रकाली'चे प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांनी केली आहे. ज्येष्ठ अभिनेते, निर्माते मच्छिंद्र कांबळी यांनी 'भद्रकाली'ची सुरुवात केली होती. त्यांच्या पश्चात प्रसाद कांबळी यांनी भद्रकालीची धुरा यशस्वीपणे सांभाळली असून त्याचा आता विस्तार केला आहे.

प्रसाद कांबळी म्हणाले,"गेलं वर्षभर 'भद्रकाली स्टुडिओज'वर काम सुरू आहे. प्रेक्षकांना चांगला आशय हवा आहे. त्यामुळे चांगला आशय असणाऱ्या कलाकृती देण्याचा प्रयत्न 'भद्रकाली स्टुडिओज' मार्फत केला जाणार आहे. विनोदी नाटकांसोबत सामाजिक भान जपणारी नाटकं भद्रकालीने दिली आहेत. त्याचप्रकारे 'भद्रकाली स्टुडिओज'मार्फतदेखील अशाच पद्धतीच्या कॉन्टेंट देण्यात येईल". 

प्रसाद कांबळी पुढे म्हणाले,"येणाऱ्या काळाचा विचार करुन ओटीटी, सिनेमे, टीव्ही या सर्व माध्यमातून भद्रकालीने सीमोल्लंघन केलं आहे. मालवणी सिनेमे पाहण्याची प्रेक्षक इच्छा व्यक्त करत आहेत. नाटकांप्रमाणे वेग-वेगळ्या पद्धतीचा कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न भद्रकाली स्टुडिओजतर्फे होणार आहे. प्रेक्षकांची अभिरुची सातत्याने बदलत असते. त्यादृष्टीने अभिरुची संपन्न आशय देण्याचं काम भद्रकाली स्टुडीओज करेल. लवकरच यासंदर्भात घोषणा केली जाईल". 

नवीन टॅलेंटला संधी

'भद्रकाली स्टुडिओज' मार्फत थोर साहित्यकांच्या कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. वेबसीरिज, सिनेमे, टीव्ही अशा सर्वच गोष्टींचा यात समावेश असेल. नविन लेखक आणि तरुणांना 'भद्रकाली स्टुडिओज' संधी देणार आहे. 'नविन टॅलेंट आणि जुन्याचा मिलाप' अशा स्वरुपात 'भद्रकाली स्टुडिओज' काम करणार आहे. 

भद्रकाली प्रोडक्शनची नाटकं -

  • अग्निदव्य
  • अफलातून
  • केला तुकानी झाला माका
    घास रे रामा
  • चाकरमानी
  • पप्पा सांगा कुणाचे
  • पांडगो इलो रे इलो
  • भय्या हातपाय पसरी
  • भारत भाग्यविधाता
  • मालवणी सौभद्र
  • मेड फॉर ईच अदर
  • म्हातारे जमींपर
  • येवा, कोंकण आपलाच असा
  • रातराणी
  • रामा तुझी माऊली
  • वस्त्रहरण
  • संशयकल्लोळ
  • सुखाशी भांडतो आम्ही
  •  संगीत देवबाभळी

संबंधित बातम्या

Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा मुंबई विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश

Natya Parishad : नाट्य परिषद आणि न संपणारे वाद, आमचं काम घटनेच्या चौकटीत - प्रसाद कांबळी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget