The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स' मध्ये चिन्मय मांडलेकर साकारणार महत्वाची भूमिका; पाहा मोशन पोस्टर
चिन्मय मांडलेकर 'द काश्मीर फाइल्स' मध्ये साकारणार महत्वाची भूमिका. मोशन पोस्टर प्रदर्शित...
The Kashmir Files : मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव, चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar)लवकरच विवेक रंजन अग्निहोत्री यांच्या बहुप्रतिक्षित 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) मध्ये एरिया कमांडर फारुख मलिक बिट्टाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) , पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आणि दर्शन कुमार यांनी साकारलेल्या महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचे लक्षवेधी मोशन पोस्टर लाँच केल्यानंतर, निर्मात्यांनी चिन्मय मांडलेकरचे आणखी एक वेधक पोस्टरचे अनावरण केले आहे, जे आपल्याला विचार प्रवृत्त करेल.
पुष्कर नाथ पंडित यांचा माजी विद्यार्थी 'बिट्टा' आता एरिया कमांडर फारुख जनाब आहेत. पंडितांपासून मुक्त अशा काश्मीरच्या शोधात, तो काश्मिरी पंडितांचा, विशेषतः पौष्कर कुटुंबाचा नाश करतो. पुढे काय होते ते हत्या आणि धैर्याची भीषण कथा आहे.
'द कश्मीर फाइल्स' या आपल्या शीर्षकाला प्रत्यक्षात उतरवणारी ही एक सत्य कथा आहे, जी काश्मिरी पंडित समुदायाच्या काश्मीर नरसंहारातील पीडित पहिल्या पिढीच्या व्हिडिओ मुलाखतींवर आधारित आहे. काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष आणि आघात यांचे हे हृदयद्रावक वर्णन आहे आणि लोकशाही, धर्म, राजकारण आणि मानवतेबद्दल डोळे उघडणारे तथ्य आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेल्या 'द ताश्कंद फाईल्स' या आपल्या चित्रपटासाठी समीक्षकांकडून प्रशंसा मिळवल्यानंतर, झी स्टुडिओ आणि लेखक-दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री आणखी एक हार्ड-हीटिंग चित्रपट सादर करण्यासाठी एकत्र आले आहेत. विवेक रंजन अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, भाषा सुंबली आणि चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. झी स्टुडिओज आणि तेज नारायण अग्रवाल, अभिषेक अग्रवाल, पल्लवी जोशी आणि विवेक रंजन अग्निहोत्री निर्मित, 'द काश्मीर फाइल्स' 26 जानेवारी 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
हे ही वाचा
Bigg Boss Marathi 3 : या आठवड्याच्या मध्यात बिग बॉसच्या घरातून एक स्पर्धक घेणार निरोप
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha