The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' वादाच्या भोवऱ्यात; मीरा रोडबद्दल विनोद करणं पडलं महागात
मीरा रोडमधील एका समाजसेवकाने 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) विरोधात तक्रार नोंदवली आहे.
The Kapil Sharma Show : छोट्या पडद्यावरील 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. ही विनोदी मालिका पुन्हा एकदा वादात अडकली आहे. मीरा रोड (Mira Road) बद्दल आक्षेपार्ह विनोद केल्यामुळे मीरा रोडमधील एका समाजसेवकाने शो विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवून कपिल शर्मानं (Kapil Sharma) माफी मागावी अशी मागणी केली आहे.
द कपिल शर्मा शो मध्ये चंदन प्रभाकर या कलाकाराने सी.आय.डी. मालिकेत ए.सी.पी. ची भूमिका करणारे अभिनेत शिवाजी साटम यांना प्रश्न विचारला की, तुम्हाला सर्व मृतदेह मीरा रोडलाच कशी मिळतात. यावर साटम यांनी मीरा रोडला प्रेतच राहतात, त्यामुळे प्रेतच मिळतात असं उत्तर दिलं. यावर शो मधील सर्वांनी हसून मीरा रोडची खिल्ली उडवली. यावरुन मीरा रोडची बदनामी केल्याचा गंभीर आरोप समाजसेवक रणवीर वाजपेयी यांनी करुन, त्यांनी स्थानिक नयानगर पोलीस ठाणे, मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय त्याचबरोबर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंञालयाकडे तक्रार नोंदवली आहे. यात मीरा रोडची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा डाव असून, कपिल शर्माने यावर जाहीर माफी मांगावी अशी मागणी सुध्दा केली आहे.
23 एप्रिल 2016 रोजी 'द कपिल शर्मा' शोची सुरूवात झाली. कपिल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो. तर कृष्णा अभिषेक ,भारती सिंह, किकू शारदा,सुमोना चक्रवर्ती हे कलाकार त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात.
हेही वाचा :
- Dharmendra : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
- Satyavan Savitri : गोष्ट सत्यवान-सावित्रीची, प्रेमावरील विश्वासाची! नवी मालिका ‘सत्यवान सावित्री’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
- Payal Rohtagi : ‘चेहरा सुंदर दिसण्यासाठी सगळेच उपाय सांगतात, पण...’, पायल रोहतगीने व्यक्त केलं ‘त्या’ गोष्टीचं दुःख!
- '...म्हणून मी द कपिल शर्मा शो सोडण्याचा निर्णय घेतला'; अली असगरनं सांगितलं कारण