एक्स्प्लोर

Telly Masala : इंद्रा काढणार मुक्ताला घराबाहेर, सागर देणार बायकोची खंबीर साथ ते शिंदे गटाच्या आमदारावर हेमंत ढोमेची संतप्त पोस्ट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Premachi Goshta : इंद्रा काढणार मुक्ताला घराबाहेर, सागर देणार बायकोची खंबीर साथ, स्वातीचं सत्य घरच्यांसमोर येणार? 

प्रेमाची गोष्ट (Premachi Goshta) या मालिकेमध्ये आदित्यच्या बर्थडे पार्टीवर बराच गोंधळ पाहायला मिळाला. त्याच्या बर्थडे पार्टीतून आदित्य मुक्ताला हकलून देतो. सावनी देखील मुक्ताच्या मातृत्वावरुन तिचा वारंवार अपमान करते. आदित्य जेव्हा मुक्ताला पार्टीतून जायला सांगतो तेव्हा सागर तिच्यासोबत जाण्यास निघतो, पण मुक्ता तेव्हा त्याला तिथे थांबवते. सध्या मुक्ता ही स्वाती आणि तिच्या नवऱ्याची मदत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Hemant Dhome : लोकप्रतिनीधींच्या वक्तव्यावर कलाकरांची परखड मतं, 'तोच गळ्यातला दात कायद्याने घशात घालावा', शिंदे गटाच्या आमदारावर हेमंत ढोमेची संतप्त पोस्ट

सध्या राज्यात सुरु असलेल्या अनेक घडामोडींवर सिनेसृष्टीतले कलाकारही अनेकदा व्यक्त होतात. सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून हे कलाकार त्यांची मत परखडपणे मांडत असल्याचं पाहायला मिळतं. राज्यात एका आमदाराच्या मुद्द्यावरुन अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेची (Hemant Dhome) पोस्ट चर्चेत आलीये. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या वाघाच्या शिकारीचं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. राजकीय वर्तुळातून देखील त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली जातेय. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Titeeksha Tawde and Siddharth Bodke Wedding : जेव्हा सिद्धार्थने सरप्राईज देत तितिक्षाला घातली लग्नाची मागणी, लग्नाआधी शेअर केला गोड व्हडिओ

 अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde) आणि सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) हे आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना देखील सुरुवात झाली आहे. त्याआधी तितिक्षाने तिच्या युट्युब चॅनवरुन सिद्धार्थने तिला केलेल्या प्रपोजचा व्हिडिओ शेअर केला आहे. चाहुल कुणाची हे नवं गाणं तितिक्षाने शेअर केलंय. त्या गाण्यामध्येच सिद्धार्थने तितिक्षाला प्रपोज केलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Prathamesh Parab Wedding : किंग खानच्या गाण्यावर रिसेप्शनमध्ये थिरकला दगडू, डान्सचा धम्माल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

 अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) हा नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड क्षितीजासोबत (Kshitija Ghosalkar) त्याच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केलीये. त्याच्या लग्नाच्या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स करत त्याला त्याच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नुकताच प्रथमेशच्या लग्नाच्या रिसेप्शनचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये प्रथमेश शाहरुख खानच्या गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळालं. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Sukh Mhanje Nakki Kay Asta : शालिनीसमोर भूतकाळ उभा राहणार, नित्या-अधिराज येणार समोर

नित्या आणि अधिराजने एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्यांच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यातच आता हे दोघेही शालिनीसमोर येणार आहेत. स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेने पुन्हा एकदा एक नवा अध्याय सुरु केलाय. जयदीप आणि गौरीचं एक नवं आयुष्य दाखवण्यात येत आहे. जयदीप आणि गौरी हे दोघेही अधिराज आणि नित्या म्हणून एकत्र आलेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा  

Aai Kuthe Kay Karte : देशमुखांसाठी झटताना लागणार अरुंधतीचा संसार पणाला? आई कुठे काय करते मालिकेचा महाएपिसोड

 'स्टार प्रवाह' वाहिनीवर सुरु होणाऱ्या नव्या मालिकांमुळे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) हा मालिका संपणार का अशा चर्चा सुरु होत्या. पण ही मालिका दुपारच्या सत्रात सुरु होणार असल्याची माहिती समोर आली. सध्या या मालिकेमध्ये अरुंधतीच्या दुसऱ्या संसारतही बऱ्याच अडचणी येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मनूमुळे अरुंधती आणि आशुतोषमध्ये सध्या तणाव आहे. त्यातच देशमुखांच्या घरी वारंवार जाण्यावरही आशुतोष आता आक्षेप घ्यायला लागला आहे. आजच्या महाएपिसोडमध्ये देशमुखांकडे जाण्याने अरुंधती आणि आशुतोषच्या संसारात कोणतं नवं वादळ येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Embed widget