Sukh Mhanje Nakki Kay Asta : शालिनीसमोर भूतकाळ उभा राहणार, नित्या-अधिराज येणार समोर
Sukh Mhanje Nakki Kay Asta : सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा महाएपिसोड आज प्रदर्शित करण्यात येणार आहे.
Sukh Mhanje Nakki Kay Asta Serial Update : नित्या आणि अधिराजने एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्यांच्या एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यातच आता हे दोघेही शालिनीसमोर येणार आहेत. स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेने पुन्हा एकदा एक नवा अध्याय सुरु केलाय. जयदीप आणि गौरीचं एक नवं आयुष्य दाखवण्यात येत आहे. जयदीप आणि गौरी हे दोघेही अधिराज आणि नित्या म्हणून एकत्र आलेत.
या नव्या अध्यायात देखील शालिनी शिर्के पाटीलची एन्ट्री झाली. जयदीप-गौरीसोबत शिर्केपाटील कुटुंबांतील अनेक सदस्यांच्या मृत्यूला शालिनी जबाबदार होती. आपल्या कुटुंबाचा सर्वनाश केल्यानंतर जवळपास 24 वर्षांनंतर शालिनी कोल्हापुरात परत आली. पण आता जयदीप आणि गौरीच्या अस्तित्वाची जाणीव शालिनीला होऊ लागली आहे. या मालिकेचा महाएपिसोड आज म्हणजेच 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 आणि रात्री 8 वाजता प्रदर्शित करण्यात येणार आहे.
शालिनी समोर येणार अधिराज - नित्या
शालिनीचा वाढदिवस असतो, तेव्हा तिच्या केकवर शालिनी वहिनी असं लिहिलेलं असतं. त्यावेळी तिला जयदीप आणि गौरीच अस्तित्व जाणवतं. तेव्हा अधिराज आणि नित्या हे शालिनीला भेटायला जाणार असतात. अखेर शालिनी शिर्के - पाटीलला भेटण्याची वेळ आली असल्याचं नित्या म्हणते. अधिराज आणि नित्या शालिनीसमोर जातात तेव्हा शालिनीला मोठा धक्का बसतो. तिच्यासमोर तिचा भूतकाळ उभा राहतो. त्यामुळे जयदीप आणि गौरी हे पुन्हा आल्याची जाणीव तिला होते.
View this post on Instagram
शालिनीचा मॉडर्न अंदाज
नव्या रुपात आणि नव्या मनसुब्यांसह शालिनी पुन्हा आली आहे. 25 वर्ष अमेरिकेत घालवल्यानंतर तिच्या रहाणीमानात बरेच बदल झाले आहेत. आता शालिनीचा मॉडर्न अंदाज पहायला मिळतोय. 25 वर्षांनंतर शालिनीचा स्वभाव बदलला नसून अजूनही तिच्या मनात सुडाची आग धगधगतेय. आता अधिराज आणि नित्या शालिनीसमोर आल्यानंतर शालिनी काय करणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली असल्याचं पाहायला मिळत आहे.