Premachi Goshta : इंद्रा काढणार मुक्ताला घराबाहेर, सागर देणार बायकोची खंबीर साथ, स्वातीचं सत्य घरच्यांसमोर येणार?
Premachi Goshta : प्रेमाची गोष्ट या मालिकेत इंद्रा मुक्ताला घराबाहेर काढते पण सागर मुक्ताला साथ देत ति कुठेही जाणार नाही असं सांगतो.
Premachi Goshta Serial Update : प्रेमाची गोष्ट (Premachi Goshta) या मालिकेमध्ये आदित्यच्या बर्थडे पार्टीवर बराच गोंधळ पाहायला मिळाला. त्याच्या बर्थडे पार्टीतून आदित्य मुक्ताला हकलून देतो. सावनी देखील मुक्ताच्या मातृत्वावरुन तिचा वारंवार अपमान करते. आदित्य जेव्हा मुक्ताला पार्टीतून जायला सांगतो तेव्हा सागर तिच्यासोबत जाण्यास निघतो, पण मुक्ता तेव्हा त्याला तिथे थांबवते. सध्या मुक्ता ही स्वाती आणि तिच्या नवऱ्याची मदत करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
स्वातीच्या नवऱ्याला एका मुलीने फसवलं असतं. त्यासाठी त्याला 15 लाख रुपयांची गरज असते. तेव्हा मुक्ता स्वाती आणि तिच्या नवऱ्याला या अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. त्यासाठी ती तिचे दागिने गहाण ठेवण्याचा निर्णय घेते. पण घरच्यांना स्वातीविषयी काहीच माहित नसल्याने मुक्ताच्या बाबतीत इंद्राचा गैरसमज होतो आणि ती तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करते.
सागर देणार बायकोची खंबीर साथ
आदित्यच्या बर्थडे पार्टीला जाताना मुक्ता तिचे सगळे दागिने सोबत घेते. आदित्यने तिला पार्टीतून जायला सांगितल्यानंतर मुक्ता ते दागिने घेऊन जाते. घरी इंद्राला कळतं की मुक्ताचे दागिने घरात नाहीत. त्यावरुन इंद्रा मुक्तावर खूप चिडते आणि ती दागिने घेऊन पळून गेल्याचा आरोप ती मुक्तावर करते. जेव्हा मुक्ता घरी येते तेव्हा इंद्रा तिला दागिन्यांविषयी विचारते. पण तिला स्वातीचं सत्य घरच्यांना सागंत नाही. त्यावेळी इंद्रा मुक्ताला घराबाहेर काढते. तेव्हा सागर तिथे येतो आणि मुक्ता कुठेही जाणार नाही असं सांगतो.
स्वातीचं सत्य घरच्यांसमोर येणार?
सागर मुक्ताला कुठेही जाणार नाही असं सांगतो. तेव्हा इंद्रा त्याला हीने दागिने विकले असं सांगते. त्यावेळी सागर मुक्ताला म्हणतो, नको तेव्हा तुझं तोंड चालतं, जेव्हा गरज आहे तेव्हा का बोलत नाहीस? तेव्हा इंद्रा सागरला अडवण्याचा प्रयत्न करते. पण या घरच्या सुनेने या घरची अब्रु वाचवली आहे, ती घराबाहेर जाणार नाही, असं सागर घरच्यांना सांगतो. त्यामुळे स्वातीचं सत्य सागरला कळलं आहे का आणि तो आता ते सत्य घरच्यांनाही सांगणार का याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. प्रेक्षकांच्या या प्रश्नांची उत्तर मालिकेच्या येत्या भागामध्ये मिळणार आहेत.