Telly Masala : घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर अभिषेकने मौन सोडले ते 'साडे माडे तीन'च्या सिक्वेलची घोषणा ; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Abhishek On His Divorce Rumours With Aishwarya : ऐश्वर्यासोबत काडीमोड होणार? अखेर अभिषेकने मौन सोडले, या गोष्टी...
मागील काही महिन्यांपासू अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या वैवाहिक आयुष्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोघेही वेगळे राहत असल्याचे म्हटले जाते. अनंत अंबानीच्या विवाह सोहळ्यात ऐश्वर्या ही लेक आराध्यासोबत आली होती. तर, बच्चन कुटुंब स्वतंत्रपणे आले होते. इतकंच नव्हे तर अभिषेक बच्चन हा ऐश्वर्या-आराध्यासोबत सुट्टीसाठी न्यूयॉर्कला गेला नव्हता. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात ग्रे घटस्फोट होणार नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता घटस्फोटाच्या बातमीवर अभिषेक बच्चनने मौन सोडले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Marathi Movie Punha Sade Made Teen : 'कुरळे ब्रदर्स' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, 'साडे माडे तीन'च्या सिक्वेलची घोषणा, अंकुश चौधरी करणार दिग्दर्शन
सतरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'साडे माडे तीन' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी याने दिग्दर्शनात पदार्पण केले होते. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, कलाकार या सगळ्याच जमेच्या बाजू होत्या. त्यामुळेच प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केले. चित्रपटातील अशोक सराफ (Ashok Saraf), भरत जाधव (Bharat Jadhav) आणि मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) ही कुरळे ब्रदर्सची तिकडी सगळ्यांनाच भावली होती. 17 वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर कमाल दाखवणारी ही त्रयी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'साडे माडे तीन' या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी (Ankush Choudhary) करणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडित आता दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणार, 'अहो विक्रमार्का’चा फर्स्ट लूक लाँच
अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) हिने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाचे सशक्त पैलू उलगडून दाखविले आहेत, प्रत्येक भूमिकेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी तेजस्विनी आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपला ठसा उमटवण्यास सज्ज झाली आहे. तेजस्विनी आता ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य अॅक्शनपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात वीरांगणा 'भवानी' ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारत आहे. दिग्दर्शक राजामौली यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या त्रिकोटी पेटा यांच्या आगामी ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटात अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत ‘अहो विक्रमार्का’ मराठी व्यतिरिक्त इतर 5 भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Bigg Boss Marathi Season 5 : ''निक्की.. डायरेक्ट बाईSSS वरुन डायरेक्ट आईSSS"; नव्या पाहुण्यांमुळे 'बिग बॉस'च्या घरात काय झालंय नेमकं?
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन (Bigg Boss Marathi New Season) सुरू झाला असून मागील 15 दिवसांत घरातील सर्व सदस्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बिग बॉसच्या घरातील तिसरा आठवडा आजपासून सुरू झाला आहे. या तिसऱ्या आठवड्यात बिग बॉसने घरातील सदस्यांसाठी नवीन टास्क दिला आहे. या नव्या पाहुण्यांना सांभाळण्याची आणि त्यांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी घरातील सदस्यांवर आली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Amitabh Bachchan On Abhishek Relationship : "रिश्ते बनते है... रिश्ते तुटते है...ये बहुत ही नाजुक पल...."; अभिषेकच्या तुटलेल्या नात्याबाबत अखेर बिग बींनी केलं होतं भाष्य
बच्चन कुटुंबीय सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काही वृत्तांनुसार आता वेगळे राहत असलेल्या या जोडप्यांचा घटस्फोट होऊ शकतो. मात्र, या सगळ्या चर्चांवर अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी मौन बाळगले असून कोणतेही भाष्य केले नाही. या सगळ्या चर्चांमध्ये बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे जुने वक्तव्य चर्चेत आले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...