Nitish Kumar Reddy : टीम इंडियात निवड होताच म्हणाले हा कोण, हा काय करणार? तोच एमसीजीवर तळपला! अवघा 21 वर्षीय नितीश रेड्डी आहे तरी कोण?
Nitish Kumar Reddy : नितीशला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाल्यावर त्या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, पर्थ कसोटीत पदार्पणातच नितीशने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.
Nitish Kumar Reddy : जेव्हा टीम इंडियाची ऑस्ट्रेलियातील बाॅर्डर गावसकर ट्राॅफीसाठी घोषणा करण्यात आली तेव्हा अनपेक्षित बदल नव्हता, पण एका नावामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या. यामध्ये एक नाव होते अवघा 21 वर्षीय नितीश कुमार रेड्डी. हा रेड्डी कोण? हा रेड्डीत ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर हा चालणार का? असे एक नव्हे, तर शेकडो प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र, तो नितीश रेड्डी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तळपत्या सूर्याप्रमाणे तळपतो आहे. आज नितीशने एमसीजीवर आपली प्रतिभा दाखवून पहिल्या खणखणीत शतकाची नोंद केली. हे शतक टीम इंडिया अडचणीत असतानाच नव्हे, तर डब्ल्यूटीसीच्या फायनलमधून बाहेर पडण्याची शक्यता असताना आलं आहे. यावरून या शतकाची महती कळते. ज्या सुनील गावसकर यांनी रिषभ पंत बाद झाल्यानंतर मूर्ख अशी संभावना करत आपला संताप व्यक्त केला. त्याच ठिकाणी नितीशच्या खेळीचे कौतुक करत नितीशचं शतक भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान शतकांपैकी एक मानले पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली.
Emotions erupted when #NitishKumarReddy brought up his maiden Test ton! 🇮🇳💪#AUSvINDOnStar 👉 4th Test, Day 4 | SUN, 29th DEC, 4:30 AM | #ToughestRivalry #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/f7sS2rBU1l
— Star Sports (@StarSportsIndia) December 28, 2024
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) सुरू आहे. या सामन्याच्या आज तिसऱ्या दिवशी (28 डिसेंबर) भारताचा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीने अप्रतिम खेळ केला. नितीशने 171 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. 10 चौकारांशिवाय एक षटकार मारला. नितीशकुमार रेड्डी क्रीझवर आले तेव्हा भारताची धावसंख्या सहा विकेट्सवर 191 धावा होती आणि फॉलोऑनचा धोका होता. पण नितीशच्या खेळीने भारत संकटातून बाहेर पडला. नितीश आणि वॉशिंग्टन सुंदरने आठव्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे फॉलोऑन वाचवण्यात रोहित ब्रिगेडला यश आले आहे.
MCG. Boxing Day. India are 221-7. Trailing by 253. Starc, Cummins, Boland, and Lyon are breathing fire at the other end.
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 28, 2024
Imagine scoring your first Test hundred under these conditions while taking India to only 120 behind.
What a knock, Nitish Kumar Reddy, what a knock 🫡 pic.twitter.com/9uM9M4gEK1
संघात निवड होताच प्रश्नचिन्ह, पदार्पणातच नितीशचे चोख प्रत्युत्तर
नितीश कुमार रेड्डीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळाल्यावर त्या निर्णयावर प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, पर्थ कसोटीत पदार्पणातच नितीशने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. नितीशने पर्थ कसोटीत 41 आणि 38* धावा केल्या होत्या. यानंतर त्याने ॲडलेड कसोटीतही दोन्ही डावात 42-42 धावा केल्या. गाबा टेस्टमध्ये नितीशच्या बॅटमधून 16 धावा आल्या, त्या खूप मोलाच्या होत्या. त्यानंतर नितीशने रवींद्र जडेजासोबत सातव्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी करून भारताला फॉलोऑन वाचवण्यास मदत केली होती. मात्र, पहिल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही नितीशकुमार रेड्डी यांना मेलबर्न कसोटीसाठी वगळले जाऊ शकते, अशी चर्चा रंगली होती. पण भारतीय संघ व्यवस्थापनाचा या युवा खेळाडूवर विश्वास कायम होता. आता 21 वर्षीय नितीशने मेलबर्न कसोटीत चमकदार कामगिरी करून चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.
- Sacrificed his job.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 28, 2024
- Retired 25 years early.
- Gave his full attention to Nitish Kumar Reddy.
- Took him to training and gave all the facilities he could despite financial conditions.
THIS IS HOW A PROUD FATHER LOOKS LIKE WHEN HIS DREAMS TURNS INTO A REALITY...!!! 🙇♂️🇮🇳 pic.twitter.com/uc5hnjAtC3
वडिलांनी सोडली नोकरी, ती हार्दिकची भेट...
नितीश कुमार रेड्डीचा क्रिकेट प्रवास सोपा नव्हता. नितीशची पार्श्वभूमी सामान्य कुटुंबातून आहे. वडिलांनी त्याच्या करिअरसाठी नोकरी सोडली आहे. वडिलांच्या मेहनतीने नितीश आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टार म्हणून उदयास आला आहे. नितीशने एका मुलाखतीत असेही म्हटले होते की, त्याचे वडील हे पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला की तो एक चांगला क्रिकेटर बनू शकतो. नितीश कुमार रेड्डीचे वडील मुत्याला यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मुलाबाबत मोठा खुलासा केला होता. भारताचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू हार्दिकला नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये भेटल्यानंतर नितीशची कारकीर्द बदलली, असे ते म्हणाले होते. मुत्याला म्हणाले की, 'एनसीएमध्ये त्याच्या U19 दिवसांच्या काळात त्याला पांड्याशी बोलण्याची संधी मिळाली. तेव्हापासून त्याला फक्त अष्टपैलू बनायचे होते.
Sunil Gavaskar said, "this century by Nitish Kumar Reddy must rank as one of the greatest hundreds in the history of Indian cricket". pic.twitter.com/qN292fcUZS
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 28, 2024
26 मे 2003 रोजी जन्मलेला नितीश कुमार रेड्डी हे टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा सुरुवातीपासूनच चाहता आहे. त्याने आपल्या प्रतिभेची चुणूक आंध्र प्रदेशकडून खेळताना दाखवली आहे. 2017-18 च्या मोसमात नितीशने विजय मर्चंट ट्रॉफीच्या रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव समाविष्ट केले होते. नितीशने 176.41 च्या प्रचंड सरासरीने 1,237 धावा केल्या होत्या. या धावा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावा आहेत. यादरम्यान त्याने नागालँडविरुद्ध त्रिशतक केले होते. 2018 च्या वार्षिक पुरस्कार समारंभात BCCI द्वारे '16 वर्षाखालील श्रेणीतील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू' म्हणून निवडले गेले तेव्हा नितीश त्याच्या फलंदाजीचा आदर्श विराटला भेटला होता.
पदार्पणाच्या T20I मालिकेत आश्चर्यकारक कामगिरी केली
देशांतर्गत क्रिकेट आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधील उत्कृष्ट कामगिरीनंतर नितीश कुमार रेड्डीची भारतीय संघात निवड करण्यात आली. नितीशने या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ग्वाल्हेरमध्ये झालेल्या त्या सामन्यात नितीश 16 धावांवर नाबाद राहिला. त्यानंतर नितीशने आपल्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 74 धावांची खेळी केली. नितीशने रणजी ट्रॉफीदरम्यान मुंबईविरुद्धच्या दुसऱ्या प्रथम श्रेणी सामन्यात 5 विकेट घेतल्या होत्या. नितीशने बांगलादेशविरुद्धच्या पदार्पणाच्या टी-20 मालिकेतही तीन विकेट घेतल्या होत्या. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चालू कसोटी मालिकेत नितीशने आतापर्यंत तीन विकेट्स घेतल्या आहेत.
नितीश कुमार रेड्डी क्रिकेट कारकिर्द
- 27 प्रथम श्रेणी सामने, 1063 धावा, 59 विकेट
- 22 लिस्ट-ए: 403 धावा, 36.63 सरासरी, 14 विकेट
- 23 T20: 485 धावा, 6 विकेट्स
- तिसरा T20I: 90 धावा, 3 विकेट्स
- 4 कसोटी: 284* धावा, 3 विकेट
इतर महत्वाच्या बातम्या