Abhishek On His Divorce Rumours With Aishwarya : ऐश्वर्यासोबत काडीमोड होणार? अखेर अभिषेकने मौन सोडले, या गोष्टी...
Abhishek On His Divorce Rumours With Aishwarya : अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात ग्रे घटस्फोट होणार नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता घटस्फोटाच्या बातमीवर अभिषेक बच्चनने मौन सोडले आहे.
Abhishek On His Divorce Rumours With Aishwarya : मागील काही महिन्यांपासू अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या वैवाहिक आयुष्यात सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोघेही वेगळे राहत असल्याचे म्हटले जाते. अनंत अंबानीच्या विवाह सोहळ्यात ऐश्वर्या ही लेक आराध्यासोबत आली होती. तर, बच्चन कुटुंब स्वतंत्रपणे आले होते. इतकंच नव्हे तर अभिषेक बच्चन हा ऐश्वर्या-आराध्यासोबत सुट्टीसाठी न्यूयॉर्कला गेला नव्हता. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात ग्रे घटस्फोट होणार नसल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता घटस्फोटाच्या बातमीवर अभिषेक बच्चनने मौन सोडले आहे.
घटस्फोटाच्या बातमीवर अभिषेकने सोडले मौन...
बॉलीवूड यूके मीडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, अभिषेक बच्चनला ऐश्वर्या राय बच्चनसोबत घटस्फोटाच्या अफवांवर विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना अभिषेकने आपली अंगठी दाखवली आणि आपण अद्याप विवाहित असल्याचे स्पष्ट केले. अभिषेकने असेही सांगितले की, या गोष्टीची विनाकारण, प्रमाणाबाहेर चर्चा करण्यात आली. एक सेलिब्रिटी म्हणून आम्हाला या चर्चांची किंमत मोजावी लागली असल्याचे अभिषेकने म्हटले.
View this post on Instagram
अभिषेकने पुढे म्हटले की, “माझ्याकडे याविषयी तुम्हाला काही सांगण्यासारखे नाही. खेदाची गोष्ट आहे की, तुम्ही सर्वांनी या चर्चेला प्रमाणापेक्षा अधिक हवा दिली. तुम्ही असे का करता ते मला माहिती आहे तुम्हाला काही बातम्या द्यायच्या असतात, हे पण ठीक आहे. आम्ही सेलिब्रिटी आहोत, त्याचा परिणाम होतो. मी अजूनही विवाहित आहे, असे अभिषेक बच्चनने म्हटले.
ऐश्वर्या-अभिषेकच्या संसाराला 17 वर्ष...
अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लग्नाला आता 17 वर्षे झाली आहेत. या जोडप्याला आराध्या बच्चन ही मुलगी आहे. अलिकडच्या वर्षांत या जोडप्याने त्यांच्या वैवाहिक आयुष्याला प्रसिद्धीपासून दूर ठेवले आहे. सोशल मीडियावर दोघेही एकमेकांना वाढदिवसाच्या किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र, अनंत अंबानी यांच्या समारंभात हे दोघेही एकत्र आले नव्हते, तेव्हा त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा तीव्र झालेल्या.