एक्स्प्लोर

Amitabh Bachchan On Abhishek Relationship : "रिश्ते बनते है... रिश्ते तुटते है...ये बहुत ही नाजुक पल...."; अभिषेकच्या तुटलेल्या नात्याबाबत अखेर बिग बींनी केलं होतं भाष्य

Amitabh Bachchan On Abhishek Relationship : आता वेगळे राहत असलेल्या अभिषेक-ऐश्वर्याचा घटस्फोट होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. मात्र, या सगळ्या चर्चांवर अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी मौन बाळगले असून कोणतेही भाष्य केले नाही. या सगळ्या चर्चांमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांचे जुने वक्तव्य चर्चेत आले आहे.

Amitabh Bachchan On Abhishek Bachchan Relationship : बच्चन कुटुंबीय सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काही वृत्तांनुसार आता वेगळे राहत असलेल्या या जोडप्यांचा घटस्फोट होऊ शकतो.  मात्र, या सगळ्या चर्चांवर अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी मौन बाळगले असून कोणतेही भाष्य केले नाही. या सगळ्या चर्चांमध्ये बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे जुने वक्तव्य चर्चेत आले आहे. 

ऐश्वर्या रायसोबत विवाहबद्ध होण्यापूर्वी अभिषेक बच्चनचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. एवढेच नाही तर त्याने करिश्मा कपूरसोबत अभिषेक बच्चनचा साखरपुडा झाला होता. मात्र, त्यानंतरच्या काही महिन्यातच साखरपुडा मोडला. यामुळे संपूर्ण बच्चन कुटुंब दु:खी झाले. अमिताभ बच्चन यांनीही आपली व्यथा मांडली होती. 

अमिताभ यांनी मांडली होती व्यथा... 

अमिताभ बच्चन यांनी एकदा करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये सहभाग घेतला होता. या चॅट शोमध्ये करण जोहरने त्यांना अभिषेक आणि करिश्माच्या साखरपुड्याबद्दल विचारले. कुटुंबासाठी हा कठीण काळ होता का? असे करण जोहरने विचारले होते.  यावर उत्तर देताना बिग बी म्हणाले होते - हा खूप नाजूक क्षण होता. नाती निर्माण होत आहेत, तुटत आहेत. हे कोणत्याही तरुण व्यक्तीसाठी कठीण आहे. जर परिस्थिती तुमच्यासाठी योग्य नसेल तर तुम्ही वेगळे होणे चांगले आहे, असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले. 

करिश्मासमोर ठेवली होती 'ही' अट...

अभिषेक आणि करिश्मा यांचा 2002 मध्ये साखरपुडा झाला होता. मात्र, हा साखरपुडा काही महिन्यातच मोडला. करिश्मासमोर ठेवलेल्या एका अटीमुळे साखरपुडा मोडला असल्याचे म्हटले जाते. लग्नानंतर करिश्मा कपूरने चित्रपटात काम करणे बंद करावे, अशी अट घालण्यात आली होती. मात्र, ही अट मंजूर नसल्याने करिश्माने साखरपुडा मोडला असल्याचे म्हटले जाते. 

अभिषेकसोबतचा साखरपुडा मोडल्यानंतर करिश्मा कपूरने संजय कपूरसोबत लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुलेही आहेत. करिश्मा पती संजय कपूरपासून विभक्त झाली आहे. ती एकटीच मुलांचे संगोपन करते. तर, दुसरीकडे अभिषेक बच्चननेही  ऐश्वर्या रायशी लग्न केले. अभिषेक-ऐश्वर्याला एक मुलगीही आहे. 

इतर महत्त्वाची बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget