(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi Season 5 : ''निक्की.. डायरेक्ट बाईSSS वरुन डायरेक्ट आईSSS"; नव्या पाहुण्यांमुळे 'बिग बॉस'च्या घरात काय झालंय नेमकं?
Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात घरात पहिल्यांदाच दोन छोट्या पाहुण्यांची एन्ट्री होणार आहे.
Bigg Boss Marathi New Season Day 16 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन (Bigg Boss Marathi New Season) सुरू झाला असून मागील 15 दिवसांत घरातील सर्व सदस्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बिग बॉसच्या घरातील तिसरा आठवडा आजपासून सुरू झाला आहे. या तिसऱ्या आठवड्यात बिग बॉसने घरातील सदस्यांसाठी नवीन टास्क दिला आहे. या नव्या पाहुण्यांना सांभाळण्याची आणि त्यांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी घरातील सदस्यांवर आली आहे.
'भाऊच्या धक्क्यावर' होस्ट रितेश देशमुखने घरातील सदस्यांना कानपिचक्या दिल्यानंतर आजपासून स्पर्धक आपला खेळ उंचावण्याचा प्रयत्न करणार आहेत. घरातील सर्वच सदस्य एकापेक्षा एक असल्याने त्यांनी 'बिग बॉस मराठी'चं घर डोक्यावर घेतलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात घरात पहिल्यांदाच दोन छोट्या पाहुण्यांची एन्ट्री होणार आहे.
'बिग बॉस'ने घेतली निक्कीची फिरकी...
'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागाचा प्रोमो आऊट झाला आहे. 'बिग बॉस'यांनी म्हटले की, "बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्यांदाच पाहुणे येणार आहेत". त्यानंतर घरात दोन बाहुल्यांची एन्ट्री झालेली दिसून येते. बाहुल्यांना पाहून घरातील सर्व सदस्य आनंदीत होतात. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होतो. एका बाहुल्याला निक्की घेते, तर एका बाहुल्याला जान्हवी घेते. त्यानंतर निक्की पुढे घन:श्यामला विचारते,"तू मामा आहेस ना". घन:श्यामही निक्कीला उत्तर देत "हो..मी मामा आहे", असं म्हणतो. त्यावर निक्की पुढे म्हणते,"बाळ माझ्यासारखं आहे". त्यानंतर निक्कीला 'बिग बॉस' म्हणतात,"निक्की.. डायरेक्ट बाईSSS वरुन डायरेक्ट आईSSS". त्यानंतर घरात एकच हशा पिकतो.
View this post on Instagram
निक्कीचा घरात कल्ला...
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा प्रोमो आऊट झाला आहे. या प्रोमोमध्ये निक्की पॅडीसह घरातील काही सदस्यांवर भडकलेली दिसून येत आहे. निक्की पॅडीला म्हणतेय,"माझ्या वस्तुंना का हात लावला?". त्यावर पॅडी म्हणतो,"माझी ड्युटी करतोय". यावर उत्तर देत निक्की म्हणते,"मला कामं करायची आहेत...समजलं ना". त्यानंतर राग अनावर झालेली निक्की पॅडीच्या कपड्यांची फेकाफेकी करते. तर, दुसरीकडे निक्की आणि अंकिताची वादावादी होते. यात निक्की घराची कॅप्टन असलेल्या अंकिताला धक्काबुक्की करते.