एक्स्प्लोर

Telly Masala : या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? ते रशियात मोदींच्या भाषणात 'आवारा' चित्रपटातील गीत; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..

OTT Release This Week :  'ककूडा' ते 'शो टाईम'...; या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

OTT Release This Week :  या आठवड्यात ओटीटीवर काही चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहे. सस्पेन्स थ्रिलर, हॉरर, कॉमेडी अशा वेगवेगळ्या धाटणीच्या वेब सीरिज, चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. जुलै महिन्याचा दुसरा आठवडा प्रेक्षकांसाठी ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Video : गाणं जुनं, पण भावना एव्हरग्रीन; रशियात मोदींच्या भाषणात 'आवारा' चित्रपटातील गीत, भारतीयांनी फडकवला तिरंगा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन दिवसीय रशिया (Russia) दौऱ्यावर असून सोमवारी संध्याकाळी ते मॉस्को शहरात पोहोचले. यावेळी मॉस्कोत हजारो भारतीय नागरिक मोदींच्या स्वागताला जमले होते, रशिया युक्रेन युद्धानंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधान जेंव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचले तेंव्हा राष्ट्राध्यक्ष पुतिन त्यांच्या स्वागतासाठी तिथे आधीच उभे होते. पीएम मोदी कारमधून उतरताच त्यांनी प्रथम हस्तांदोलन करत त्यांना मिठी मारली आणि दोघांमधील मैत्रिपूर्ण संबंध या भेटीतून जगाला दाखवून दिले. मोदींनी आज मॉस्को शहरात भारतीयांशी संवाद साधला. भारतीयांना उद्देशून बोलताना राज कपूर (Raj Kapoor) यांच्या आवारा चित्रपटातील गाण्याच्या लाईनच मोदींनी बोलून दाखवल्या. त्यावेळी, उपस्थित भारतीयांनी फिर भी दिल है हिंदुस्थानी.. अशी दाद मोदींना दिली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Tejas Thackeray : अनंत अंबानीचं लग्न, मित्र तेजस ठाकरेचा भन्नाट डान्स, ये लड़की, हाए, अल्लाह गाण्यावर थिरकले

सध्या संपूर्ण देशात मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या लेकाच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. संगीत, हळद असे अनेक कार्यक्रम पार पडत असून राजकीय नेत्यांपासून बॉलीवूडकरांपर्यंत अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहत आहेत. इतकच नव्हे तर ही मंडळी या सोहळ्यांना उपस्थित राहून ते सोहळे गाजवत देखील आहेत. अंनत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) पार पडलेल्या संगीत सोहळ्यातही अनेकांचा विशेष अंदाज पाहायला मिळाला. पण या सगळ्यात  उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांच्या नृत्याने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Marathi Serial Updates Lakhat Ek Amcha Dada Serial : ''20 किलोची पालखी आणि तो पेहराव... दोनदा चक्कर आली, तरी सीन पूर्ण केला"; 'सूर्यादादा'नं सांगितला यात्रेच्या शूटिंगचा 'तो' किस्सा

 छोट्या पडद्यावर सध्या नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'झी मराठी'वर (Zee Marathi) मागील काही महिन्यांपासून नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.  सोमवारपासून झी मराठीवर 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पहिल्याच एपिसोडवर प्रेक्षकांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे. या मालिकेचा नायक असलेल्या सूर्यादादाच्या यात्रेतील लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.  सूर्यादादाचा यात्रेमधला यात्रेचा सीनबद्दल अभिनेता नितीश चव्हाणने आपला अनुभव शेअर केला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Salman Khan : सलमान खान गोळीबार प्रकरणात 1 हजार 735 पानी आरोपपत्र, 46 साक्षीदारांची साक्ष, 22 पंचनामे; पोलिसांच्या कारवाईची A टू Z माहिती

 बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावरील गोळीबार प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयातील विशेष मोक्का कोर्टात हे आरोपपत्र दाखल केलं. फरार आरोपी लॉरेन्स बिश्नोई व त्याचा भाऊ अनमोल बिश्नोईसह अटक केलेल्या आरोपींविरुद्ध पोलिसांनी 1 हजार 735 पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. यापूर्वी या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनीही एक आरोपपत्र दाखल केलेलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Worli Hit And Run Case: 'वरळी हिट अँड रन' प्रकरणात मृत पावलेली महिला जेष्ठ अभिनेत्याची सख्खी पुतणी, संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाले, 'फाशी झालीच पाहिजे...'

मुंबईचा रविवार हा एका धक्कादायक घटनेमुळे हादरुन गेला. मुंबईतील वरळी परिसरात एका दाम्पत्याचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईतील या हिट अँड रन (Worli Hit and Run Case) प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली. वरळीत शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाच्या (Shinde Group) उपनेत्याच्या मुलानं महागड्या गाडीनं महिलेला चिरडलं. कावेरी नाखवा असं या महिलेचं नाव आहे. ज्या महिलेला त्यानं चिरडलं, ती महिला अभिनेते जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांची सख्खी पुतणी आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget