एक्स्प्लोर

OTT Release This Week :  'ककूडा' ते 'शो टाईम'...; या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

OTT Release This Week : जुलै महिन्याचा दुसरा आठवडा प्रेक्षकांसाठी ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.

OTT Release This Week :  या आठवड्यात ओटीटीवर काही चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहे. सस्पेन्स थ्रिलर, हॉरर, कॉमेडी अशा वेगवेगळ्या धाटणीच्या वेब सीरिज, चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. जुलै महिन्याचा दुसरा आठवडा प्रेक्षकांसाठी ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे. 

या आठवड्यात रिलीज होणारे वेब सीरिज, चित्रपटांची यादी...

> कमांडर करण सक्सेना

ही ॲक्शन थ्रिलर मालिका रॉ एजंट कमांडर करण सक्सेनाची गोष्ट आहे. अभिनेता गुरमीत चौधरी हा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ही वेब सीरिज भारत आणि पाकिस्तानमधील वादावर आधारित आहे. करणला आता देशासमोरील संकटाचा सामना करावा लागत आहे. तो विश्वासघात आणि राजकीय कारस्थानांनी वेढलेल्या जगाचा सामना करतो. यातून देशाचे संरक्षण करण्यासाठी त्याचे आपल्या टीमसह प्रयत्न सुरू होतात. या वेब सीरिजच्या माध्यमातून मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि ज्ञानदा रामतीर्थकर या ओटीटीवर पदार्पण करणार आहे.

कुठे आणि कधी पाहाल? ही वेब सीरिज 8 जुलै ओटीटी प्लॅटफॉर्मवर डिस्नी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. 

- वाइल्ड वाइल्ड पंजाब

धमाल मस्ती, कॉमेडी जॉनर असलेला हा 'वाइल्ड वाइल्ड पंजाब' चित्रपट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची चांगलीच चर्चा झाली. या चित्रपटात मंजोत सिंह, वरुण शर्मा, सनी सिंह आणि जस्सी गिल आदी कलाकार आहेत. 

कुठे आणि कधी पाहाल? हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. 

- 36 डेज् (36 Days)

हा एक थ्रिलर चित्रपट आहे. अभिनेत्री नेहा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. तिने फराह नावाच्या मुलीची रहस्यमय भूमिका साकारली आहे. ती तिच्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात अराजकता आणते.  हळूहळू पडदा उघडतो आणि सत्य समोर आल्यावर एकच खळबळ उडते. '36 डेज'मध्ये पूरब कोहली, श्रुती सेठ, शारिब हाश्मी, अमृता खानविलकर आणि चंदन रॉय सन्याल हे कलाकार आहेत.

कुठे आणि कधी पाहाल? 12 जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. 

ककूडा

सोनाक्षी सिन्हा, साकिब सलीम आणि रितेश देशमुख यांचा बहुप्रतिक्षित 'ककूडा' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे.'मुंज्या'चा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार याचा हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. अनेक वर्षांपासून या गावाला शाप लागला आहे. दर मंगळवारी सायंकाळी 7.15 वाजता प्रत्येकाला आपल्या घराचा छोटा दरवाजा उघडा ठेवावा लागतो. तसे न केल्यास  त्या घरातील कुटुंब प्रमुखाचा मृत्यू होतो. 

कुठे आणि कधी पाहाल? 'ककूडा' 12 जुलै रोजी OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर रिलीज होणार आहे.

- पिल 

फार्मा जगताचा काळा चेहरा आणि राजकीय-प्रशासकीय लागेबंध  या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून अभिनेता रितेश देशमुख ओटीटी वेब सीरिजमध्ये पदार्पण करत आहे.  रितेश देशमुख डॉ. प्रकाश यांची भूमिका साकारत आहे. फार्मा क्षेत्रात सुरू असलेला लोकांच्या जीवावर उठलेला घातक व्यापाराविरोधात तो भूमिका घेत आहे. 

कुठे आणि कधी पाहाल? 'पिल' ही वेब सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर 12 जुलैपासून पाहता येईल. 

शो टाईम- सीझन 2

शोबिज जगातील काळी बाजू  या वेब सीरिजमध्ये दिसते.  या वेब सीरिजमध्ये नेपोटिझम आणि सिनेइंडस्ट्रीमधील घाणेरडं राजकारण ही दाखवण्यात आले आहे. या सीरिजच्या पहिल्या सीझनला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजमध्ये इम्रान हाश्मी, राजीव खंडेलवाल, महिमा मकवाना, नसिरुद्दीन शहा, श्रिया सरन यांच्या भूमिका आहेत.

कुठे आणि कधी पाहाल? ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नी हॉटस्टारवर ही वेब सीरिज होणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suraj Chavan: विजेता झाल्यावर 14 लाखांचं करणार काय? झापुक झुपुक स्टाईलमध्ये सुरज म्हणाला..
विजेता झाल्यावर 14 लाखांचं करणार काय? झापुक झुपुक स्टाईलमध्ये सुरज म्हणाला..
Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?DSuraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेताABP Majha Headlines :  11 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivsmarak Special Report :  समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suraj Chavan: विजेता झाल्यावर 14 लाखांचं करणार काय? झापुक झुपुक स्टाईलमध्ये सुरज म्हणाला..
विजेता झाल्यावर 14 लाखांचं करणार काय? झापुक झुपुक स्टाईलमध्ये सुरज म्हणाला..
Bigg Boss Marathi : 6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
6 व्या नंबरच्या जान्हवीला 900000 रुपये, दुसऱ्या क्रमांकाच्या अभिजीतला फक्त गिफ्ट व्हाउचर; शेवटच्या क्षणी बिग बॉसने काय गेम केला?
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Embed widget