Video : गाणं जुनं, पण भावना एव्हरग्रीन; रशियात मोदींच्या भाषणात 'आवारा' चित्रपटातील गीत, भारतीयांनी फडकवला तिरंगा
पंतप्रधान मोदींनी भारतीयांना संबोधित करताना भारत आणि रशिया यांच्यातील संबंधावर भाष्य केलं.
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन दिवसीय रशिया (Russia) दौऱ्यावर असून सोमवारी संध्याकाळी ते मॉस्को शहरात पोहोचले. यावेळी मॉस्कोत हजारो भारतीय नागरिक मोदींच्या स्वागताला जमले होते, रशिया युक्रेन युद्धानंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधान जेंव्हा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचले तेंव्हा राष्ट्राध्यक्ष पुतिन त्यांच्या स्वागतासाठी तिथे आधीच उभे होते. पीएम मोदी कारमधून उतरताच त्यांनी प्रथम हस्तांदोलन करत त्यांना मिठी मारली आणि दोघांमधील मैत्रिपूर्ण संबंध या भेटीतून जगाला दाखवून दिले. मोदींनी आज मॉस्को शहरात भारतीयांशी संवाद साधला. भारतीयांना उद्देशून बोलताना राज कपूर (Raj Kapoor) यांच्या आवारा चित्रपटातील गाण्याच्या लाईनच मोदींनी बोलून दाखवल्या. त्यावेळी, उपस्थित भारतीयांनी फिर भी दिल है हिंदुस्थानी.. अशी दाद मोदींना दिली.
पंतप्रधान मोदींनी भारतीयांना संबोधित करताना भारत आणि रशिया यांच्यातील संबंधावर भाष्य केलं. यावेळी भारत आणि रशिया यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवर बोलताना मोदींनी आवारा चित्रपटातील राज कपूर यांच्या गाण्याच्या लाईनही बोलून दाखवल्या. या गाण्याचे शब्द ऐकून भारतीयांनीही फिर भी दिल है हिंदुस्थानी... असे म्हणत मोदींना दाद दिली. पुढे बोलताना मोदी म्हणाले, रुस शब्द ऐकताच भारतीयांच्या मनात पहिला शब्द येतो, भारताच्या सुख-दु:खाचा साथी, भारताच विश्वासू मित्र. रुसमध्ये हिवाळ्यात तापमान कितीही खालावलेलं असलं तरी, भारत-रुस यांच्यातील मैत्रीचं तापमान नेहमीच प्लसमध्ये राहिली आहे, एक वेगळीच उब या दोस्तीत आहे. म्युच्युअल ट्रस्ट आणि म्युच्युअल रेस्पेक्टच्या मजबूत धाग्यांनी हे नातं जोडलं गेलंय, असे मोदींनी म्हटले. तसेच, ते गाणं येथील प्रत्येक भारतीयांच्या घरात गायलं जातंय, सिर पर लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्थानी... हे गाणं भलेही जुनं झालं असेल, पण या गाण्यामागील भावना एव्हरग्रीन आहे, असेही मोदींनी यावेळी म्हटले. तसेच, मोदींनी गाण्याची केवळ एक लाईन म्हटली, सिर पर लाल टोपी रूसी... त्यानंतर भारतीयांनी फिर भी दिल है हिंदुस्थानी.. असे म्हणत मोदींच्या गाण्याला दाद दिली.
रूस शब्द सुनते ही हर भारतीय के मन में पहला शब्द आता है...भारत के सुख-दुख का साथी, भारत का भरोसेमंद दोस्त।
— BJP (@BJP4India) July 9, 2024
रूस में सर्दी के मौसम में temperature कितना ही minus में नीचे क्यों न चला जाए...
भारत-रूस की दोस्ती हमेशा plus में रही है, गर्मजोशी भरी रही है।
ये रिश्ता mutual trust और… pic.twitter.com/xktnmxaO9B
हिंदी चित्रपटसृष्टीने अजरामर केलेलं हे गाणं राज कपूर यांच्या आवारा चित्रपटातील असून हा चित्रपट 1951 साली प्रदर्शित झाला होता. नर्गिस दत्त आणि राज कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील देशभक्तीपर हे गीत मुकेश कुमार यांनी गायलेलंल आहे. हे गाणं जुनं असलं तरी नक्कीच एव्हरग्रीन आहे. कारण, या गाण्यातील फिर भी दिल है हिंदुस्थानी हे वाक्य भारतीयांची छातीअभिमानाने फुगवतात.
गाण्यातील पहिलं कडवं
मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिशतानी
सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी
मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिशतानी
सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदुस्तानी
मेरा जूता है जापानी
पुतीन यांच्यासोबत हिंदीतच संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिखर परिषदेसाठी रशियात पोहोचले असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चक्क हिंदीतच मोदींनी संवाद साधला. पुतीन हे त्यांच्या मातृभाषेतच बोलणे पसंत करतात. सोमवारी एका खासगी डिनरदरम्यान पंतप्रधान मोंदींसोबतत झालेल्या भेटीत राष्ट्राध्यक्ष पुतिन रशियन भाषेत बोलताना दिसले आणि पंतप्रधान मोदी हिंदीत बोलताना दिसले. या परिस्थितीत एकमेकांना समजून घेण्यासाठी दोन्ही देशांतून दूभाषकांचे नेमणूक करण्यात येते. यावेळी दोन्ही देशांकडून दुभाषिक नेमण्यात आले होते.