एक्स्प्लोर
व्हीजे निखिल चिनप्पाच्या घरी लवकरच नवा पाहुणा
लग्नाच्या 12 वर्षांनंतर निखिल आणि पर्लच्या विश्वात एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
मुंबई : 'स्प्लिट्सव्हिला'सारख्या गाजलेल्या शोचा होस्ट, प्रसिद्ध व्हीजे निखिल चिनप्पा बाबा होणार आहे. निखिलची पत्नी पर्लने इन्स्टाग्राम अकाऊण्टवर दोघांचा फोटो शेअर करुन ही गुड न्यूज दिली आहे.
पर्लने निखिलसोबतचा जुना फोटो इन्स्टावर पोस्ट केला आहे. 'मी या सुंदर माणसाच्या बाळाची आई होणार आहे. एक दिवस आम्ही आमच्या बाळासोबत पुन्हा इथे येऊ आणि तेव्हा जसा डान्स केला होता, तसाच डान्स पुन्हा करु' असं कॅप्शन तिने दिलं आहे. पर्लने दोघांचा बीचवरचा फोटो शेअर केला आहे.
2000 साली निखिल आणि पर्लने डेटिंग सुरु केलं होतं. सहा वर्षांनी दोघं विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या 12 वर्षांनंतर त्यांच्या विश्वात एका नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
नव्वदच्या दशकातील अखेरपासून निखिल चिनप्पा व्हिडिओ जॉकी म्हणून प्रकाशझोतात आला. त्यानंतर रोडीज्, स्प्लिट्सव्हिला यासारख्या कार्यक्रमांचं त्याने होस्टिंग केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement