एक्स्प्लोर
सोनी टीव्हीचा मोठा निर्णय, 'द कपिल शर्मा शो' बंद
आता कपिल शर्माचा प्रतिस्पर्धी कृष्णा अभिषेक त्याला रिप्लेस करणार आहे. सोनी टीव्हीवर शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता कृष्णा अभिषेकचा 'द ड्रामा कंपनी' हा शो दाखवला जाईल.

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. 'द कपिल शर्मा शो' बंद करण्याचा मोठा निर्णय सोनी टीव्हीने घेतला आहे. कपिल शर्माच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शोचं चित्रीकरण वारंवार रद्द केलं जात होतं. त्यामुळे चॅनलने हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण चॅनल कपिलचा शो कायमचा बंद करणार नाही. कपिल शर्माची तब्येत पाहता सोनी टीव्हीने त्याला ब्रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कपिल शर्मा सोनी टीव्हीवर पुन्हा कधी दिसणार हे अद्याप चॅनलने स्पष्ट केलेलं नाही. पुन्हा शूटिंग रद्द, कपिल शर्माला दारुचं व्यसन? अभिषेक कपिलला रिप्लेस करणार आता कपिल शर्माचा प्रतिस्पर्धी कृष्णा अभिषेक त्याला रिप्लेस करणार आहे. सोनी टीव्हीवर शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता कृष्णा अभिषेकचा 'द ड्रामा कंपनी' हा शो दाखवला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, 8 वाजता प्रसारित होणाऱ्या द ड्रामा कंपनीच्या जागी 'सुपर डान्सर 2' दाखवला जाईल आणि 9 वाजता 'द ड्रामा कंपनी' प्रसारित होईल. जेव्हा कपिल बरा होऊन परतेल, तेव्हा त्याच्या शोसाठी रात्री दहाचा टाईम स्लॉट दिला जाईल. आता ‘द कपिल शर्मा शो’मधून नवज्योतसिंह सिद्धू बाहेर! अनेकांचा कपिलला अलविदा कपिल शर्मा सध्या त्याच्या करिअरच्या वाईट काळातून जात आहे. टीआरपीमध्ये अव्वल राहणारा कपिल शर्माचा शो सध्या टॉप 20 मध्येही नसतो. याशिवाय सुनील ग्रोव्हरसह चंदन प्रभाकर, अली असगर आणि सुगंधा मिश्राने कपिलच्या शोला अलविदा केला होता. तर नवज्योतसिंह सिद्धूही त्याच्या शोमधून बाहेर आहेत. तर कपिलसोबतचा वाद मिटल्यानंतर चंदन प्रभाकर शोमध्ये परतला. मात्र अली असगर आणि सुगंधाने कपिलचा प्रतिस्पर्धी कृष्णा अभिषेकचा शो जॉईन केला. …म्हणून कपिल शर्मा मनोज वाजपेयीसमोर ढसाढसा रडला? तब्येतीचं कारण देत शूटिंग रद्द कपिल शर्माने प्रकृतीचं कारण देत शेवटच्या क्षणी चित्रीकरण रद्द केलं होतं. अभिनेता शाहरुख खान, अनिल कपूर, अजय देवगण यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांना शूटिंग न करताच कपिल शर्माच्या शोमधून रिकाम्या हाती परतावं लागलं होतं. कपिल शर्माला दारुचं व्यसन लागलं आहे. तो लेट नाईट पार्टी करतो, त्यामुळे सकाळी वेळेवर उठत नाही. त्यामुळेचतब्येतीचं कारण देऊन तो चित्रीकरण रद्द करतो, अशी चर्चा आहे. ‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्याची चिन्हं, सुनील ग्रोव्हरचा नवा शो? कॉमेडी स्टार कपिल शर्मा नेत्रदान करणार!
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र























