एक्स्प्लोर

Telly Masala : अभिनेता सोहेल खानच्या आयुष्यातही पुन्हा प्रेमाची एन्ट्री ते बिग बॉस 18 मधील स्पर्धकांची यादी; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..

Kangana Ranaut : BMC नं बुलडोझर चालवलेला बंगला कंगना रणौतनं विकला, कोट्यवधींचं नुकसान सोसून केलं डिल

Kangana Ranaut Bungalow : भाजप खासदार अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईतील बंगला विकला आहे. मुंबई पालिकेने कारवाई केलेला बंगला कंगनानं विकला आहे. याच बंगल्यामध्ये तिचं घर आणि ऑफिस होतं. मात्र, आता ही मालमत्ता तिने कोट्यवधींना विकल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, या बंगल्याच्या डिलमुळे तिला मोठं नुकसान झालं, असल्याचं बोललं जात आहे.  

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

VIDEO : अभिनेता सोहेल खानच्या आयुष्यातही पुन्हा प्रेमाची चाहूल? मिस्ट्री गर्लसोबत डिनर डेट, रेस्टॉरंटबाहेर पडताना मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद

Sohail Khan With Mystery Girl For Dinner Date : अभिनेता सलमान खानचा लहान भाऊ बॉलिवूड अभिनेता सोहेल खान याच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची चाहूल लागल्याची चर्चा आहे. सोहेल खान आणि सीम सजदेह यांचा घटस्फोट झाला आहे. 24 वर्ष एकत्र संसार केल्यानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता सोहेल खानचा मिस्ट्री गर्लसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर सोहेल खान गर्लफ्रेंडसोबत डिनर डेटला गेल्याची चर्चा रंगली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Amitabh Bachchan Cryptic Post : ''सगळं काही संपून चाललंय...''; अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये बिग बींची पोस्ट, चाहत्यांची चिंता वाढली

Amitabh Bachchan Cryptic Post : ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. या जोडप्याने एप्रिल 2007 मध्ये लग्न केले आणि त्यांना आराध्या बच्चन ही मुलगी आहे. मात्र, मागील काही काळापासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यात सारंकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. या दोघांचा काडीमोड होणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चा सुरू असताना अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Rashmika Mandanna Accident : रश्मिका मंदानाचा झाला अपघात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली हेल्थ अपडेट

Rashmika Mandanna Accident :  दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये लोकांच्या पसंतीस उतरलेली आ 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आता हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची जादू चालवत आहे. मात्र, मागील काही काळ ती सोशल मीडियावर फारशी अॅक्टिव्ह नव्हती. त्याशिवाय, ती पापाराझींनाही कुठे दिसली नाही. आता, त्यामागील कारण समोर आले आहे. रश्मिकाने अपघात झाल्याने ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नव्हती. रश्मिकाने स्वत: इन्स्टाग्रामवर हेल्थ अपडेट दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss 18 : सलमान खानकडून शूटींगला सुरुवात, बिग बॉस 18 मध्ये 'हे' 14 स्पर्धक सहभागी होणार

Bigg Boss New Season Update : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो बिग बॉसचा 18 वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहतात. बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानचे चाहते तर या शोकडे डोळे लावून बसलेले असतात. सलमान खान जेव्हा बिग बॉस होस्ट करतो तेव्हा प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित होतो. बिग बॉसच्या यंदाच्या सीझन संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सलमान खानने यंदाच्या सीझनच्या शूटींगला सुरुवात केली आहे. बिग बॉसचा 18 शोमध्ये यंदा किती आणि कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss Marathi Suraj Chavan :  आयुष्यात टोकाचा निर्णय घेण्याआधी सूरज चव्हाणला आठवा; व्हिडीओ क्लिप होतेय व्हायरल...

Bigg Boss Marathi Suraj Chavan :  'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) रील स्टार सूरज चव्हाणने (Suraj Chavan) छाप सोडली आहे. गुलिगत धोका म्हणून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या सूरजची एन्ट्री झाल्यानंतर  अनेकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. त्यानंतर सूरजने घरातील वावर आणि आपल्या स्ट्रगलबद्दल इतर सदस्यांना सांगितल्यावर प्रेक्षकांमध्ये त्याच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.अनेकजण सूरजला पाठिंबा देत आहे. तर, दुसरीकडे एका कीर्तनकारांनीदेखील सूरजचे कौतुक केले आहे. जेव्हा कधी टोकाचा निर्णय घेण्याचा विचार कराल तेव्हा सूरज चव्हाणला आठवा असे आवाहन त्यांनी केले. सध्या याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

स्नेहल पावनाक
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aarya Ambekar: आर्या आंबेकरचा मालिकेतून सुरेल प्रवास, सांगितला ‘कमळी’ टीमसोबतचा खास अनुभव; म्हणाली..
आर्या आंबेकरचा मालिकेतून सुरेल प्रवास, सांगितला ‘कमळी’ टीमसोबतचा खास अनुभव; म्हणाली..
Zee Marathi Serial: झी मराठीची प्रेक्षकांसाठी खास मेजवानी! ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ मधून एक्स्ट्रा मनोरंजन
झी मराठीची प्रेक्षकांसाठी खास मेजवानी! ‘आपली दुपार’ आणि ‘मनोरंजनाचा Powerplay’ मधून एक्स्ट्रा मनोरंजन
Kamali Marathi TV Serial: कमळी-ऋषीच्या नात्यात नवा ट्विस्ट; 'अनामिका'च्या एन्ट्रीमुळे घडणार मोठा बदल, गोड गळ्याच्या 'या' अभिनेत्रीची एन्ट्री
कमळी-ऋषीच्या नात्यात नवा ट्विस्ट; 'अनामिका'च्या एन्ट्रीमुळे घडणार मोठा बदल, 'या' अभिनेत्रीची एन्ट्री
Chhaya Kadam Shares Post For Gaurav More: 'फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून...', दिग्गज अभिनेत्रीची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेसाठी डोळे पाणावणारी पोस्ट
'फिल्टरपाड्याच्या झोपडपट्टीतून...', दिग्गज अभिनेत्रीची 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेसाठी डोळे पाणावणारी पोस्ट

व्हिडीओ

Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mhaiskar : महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले, ते धक्कादायक होतं; मनीषा म्हैसकरांनी सांगितली 'ती' आठवण
Nitin Gadkari : मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार, नारायण राणेंसमोर नितीन गडकरींचा शब्द
मुंबई गोवा महामार्गाचं काम मे महिना संपण्याअगोदर पूर्ण करणार पण उद्घाटनाला येणार नाही, नितीन गडकरींनी कारण सांगितलं
Stock Market : शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
शेअर बाजारात सेन्सेक्स- निफ्टीत 5 वर्षातील सर्वात मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या कमाईत एका आठवड्यात 29 लाखांची कमाई
Donald Trump : चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
चर्चा निष्फळ ठरली तर हल्ला करु, सर्वात धोकादायक शस्त्र तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Embed widget