Kangana Ranaut : BMCनं बुलडोझर चालवलेला बंगला कंगना रणौतनं विकला, कोट्यवधींचं नुकसान सोसून केलं डिल
Kangana Ranaut Mumbai Bungalow : कंगना रनौतने मुंबईच्या वांद्रे भागातल्या पाली हिल परिसरातला तिचा बंगला 32 कोटींना विकला आहे.
Kangana Ranaut Bungalow : भाजप खासदार अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईतील बंगला विकला आहे. मुंबई पालिकेने कारवाई केलेला बंगला कंगनानं विकला आहे. याच बंगल्यामध्ये तिचं घर आणि ऑफिस होतं. मात्र, आता ही मालमत्ता तिने कोट्यवधींना विकल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय, या बंगल्याच्या डिलमुळे तिला मोठं नुकसान झालं, असल्याचं बोललं जात आहे.
BMC नं बुलडोझर चालवलेला बंगला कंगनानं विकला
खासदार-अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut) मुंबईच्या वांद्रे भागातल्या पाली हिल परिसरातला (Kangana Ranaut Bandra Bungalow Deal) तिचा बंगला 32 कोटींना विकला आहे. कंगनाचा हा तोच वादग्रस्त बंगला आहे, ज्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात तोडक कारवाई झाली होती. कंगनाने सप्टेंबर 2017 मध्ये 20 कोटींना हा बंगला खरेदी केल्याचं कागदपत्रांवरून समोर आलं आहे. हा बंगला 3,075 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे आणि 565 स्क्वेअर फूट पार्किंगची जागा आहे.
कंगना रणौतला कोट्यवधींचं नुकसान?
गेल्या महिन्यात, कोड इस्टेट नावाच्या यूट्यूब चॅनेलने एक व्हिडीओ देखील शेअर केला होता, ज्यामध्ये एक प्रोडक्शन हाऊस ऑफिस विक्रीसाठी असल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रोडक्शन हाऊस आणि मालकाच्या नावाचा उल्लेख नसला तरी व्हिडीओमध्ये वापरलेले फोटो आणि व्हिज्युअल हे कंगनाचेच ऑफिस असल्याचे दिसून आलं होतं. अनेक सोशल मीडिया युजर्सने कमेंट सेक्शनमध्ये कंगनाचे ऑफिस असल्याचा अंदाजही लावला होता. त्याचं प्रोडक्शन हाऊसची डिल आता झाली आहे.
View this post on Instagram
पालिकेनं बुलडोझर चालवलेला बंगला स्वस्तात विकला
दरम्यान, कंगना रणौतने हा बंगला स्वस्तात विकल्याचं बोललं जात आहे. कंगनाच्या बंगल्याची जागा सुमारे 3050 स्केअर फूट आणि त्यात सुमारे 500 स्केअर फिटचा पार्किंग आहे. दोन मजले असलेल्या या बंगल्याची किंमत सुमारे 40 कोटी असल्याचं बोललं जात आहे. पण, कंगनाने हा बंगला 32 कोटींना विकला आहे. त्यामुळे तिने नुकसान सोसून या बंगल्याचं डिल केल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे कंगनाला सुमारे आठ कोटींचं नुकसान झाल्याचंही बोललं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :