Rashmika Mandanna Accident : रश्मिका मंदानाचा झाला अपघात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली हेल्थ अपडेट
Rashmika Mandanna Accident : रश्मिका मंदानाचा एक छोटासा अपघात झाला. तिने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली.
Rashmika Mandanna Accident : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये लोकांच्या पसंतीस उतरलेली आ 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आता हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची जादू चालवत आहे. मात्र, मागील काही काळ ती सोशल मीडियावर फारशी अॅक्टिव्ह नव्हती. त्याशिवाय, ती पापाराझींनाही कुठे दिसली नाही. आता, त्यामागील कारण समोर आले आहे. रश्मिकाने अपघात झाल्याने ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नव्हती. रश्मिकाने स्वत: इन्स्टाग्रामवर हेल्थ अपडेट दिली आहे.
रश्मिका मंदानाने 9 सप्टेंबर रोजी स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. फोटोसोबत एक लांबलचक कॅप्शनही लिहिले. आपला एक छोटासा अपघात झाला असल्याचे तिने सांगितले. आता आपण बरे असल्याची माहिती तिने आपल्या पोस्टमध्ये दिली.
रश्मिकाने पोस्टमध्ये काय म्हटले?
रश्मिकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, 'हॅलो मित्रांनो, कसे आहात? मला माहित आहे की मी बऱ्याच काळापासून सार्वजनिक किंवा सोशल मीडियावर नव्हती. आता बराच वेळ गेला आहे. मी गेल्या महिन्यात फार सक्रिय नव्हती. माझा एक छोटासा अपघात झाल्याने मी सक्रीय नव्हती. सध्या मी बरी असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रश्मिकाने म्हटले.
View this post on Instagram
रश्मिकाने दिली हेल्थ अपडेट...
रश्मिकाने म्हटले की, डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार, मी घरीच होते. आता प्रकृतीत सुधारणा होत असून मी आता सुपर अॅक्टिव्ह होण्याच्या टप्प्यात आहे. मला आता तुमच्या शुभेच्छांची आवश्यकता असल्याचे रश्मिकाने म्हटले. तिने पुढे म्हटले की, आयुष्य हे लहान आणि नाजूक आहे आणि उद्या काय होईल, याची आपल्याला कल्पना नाही. त्यामुळे दरदिवसाचा आनंद घ्या, आणि हो मी सध्या खूप मोदक खात असल्याचे रश्मिकाने सांगितले.
रश्मिकाचे आगामी चित्रपट...
रश्मिकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी तिला चांगल्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या. एका यूजरने लिहिले, 'रश्मिका, तू बरी झाली हे ऐकून खूप आनंद झाला.' एकजण म्हणाला, 'लवकर बरी हो.' खचून जाऊ नका. आरोग्य ही संपत्ती आहे.'
रश्मिका ही रणबीर कपूरसोबत 'ॲनिमल'मध्ये दिसली होती. आता ती अल्लू अर्जुनसोबत 'पुष्पा 2'मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती सलमान खानसोबत 'सिकंदर' आणि विकी कौशलच्या 'छावा'मध्येही दिसणार आहे.