एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi Suraj Chavan :  आयुष्यात टोकाचा निर्णय घेण्याआधी सूरज चव्हाणला आठवा; व्हिडीओ क्लिप होतेय व्हायरल...

Bigg Boss Marathi Suraj Chavan :  जेव्हा कधी टोकाचा निर्णय घेण्याचा विचार कराल तेव्हा सूरज चव्हाणला आठवा असे आवाहन करणारी व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Bigg Boss Marathi Suraj Chavan :  'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) रील स्टार सूरज चव्हाणने (Suraj Chavan) छाप सोडली आहे. गुलिगत धोका म्हणून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या सूरजची एन्ट्री झाल्यानंतर  अनेकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. त्यानंतर सूरजने घरातील वावर आणि आपल्या स्ट्रगलबद्दल इतर सदस्यांना सांगितल्यावर प्रेक्षकांमध्ये त्याच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.अनेकजण सूरजला पाठिंबा देत आहे. तर, दुसरीकडे एका कीर्तनकारांनीदेखील सूरजचे कौतुक केले आहे. जेव्हा कधी टोकाचा निर्णय घेण्याचा विचार कराल तेव्हा सूरज चव्हाणला आठवा असे आवाहन त्यांनी केले. सध्या याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सूरजच्या स्वभावावर आणि त्याने आयुष्यात केलेल्या संघर्षाला  प्रेक्षकांनी दाद दिली आहे. अनेकांनी सूरज चव्हाणसाठी आपण बिग बॉस मराठीचा हा सीझन पाहत असल्याचे म्हटले आहे. छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सूरजने ग्लॅमरस जगात आपले स्थान मिळवले आहे. बिग बॉस मराठीमधील माजी स्पर्धकांसह इतर कलाकारांनीदेखील त्याला पाठिंबा दिला आहे. 

सूरजचे कौतुक करणारी व्हिडीओ क्लिप व्हायरल...

वारकरी सांप्रदायातून सूरजला पाठींबा मिळत असून त्याच्या  खेळाचे कौतुक होत आहे. कीतर्नकार प्रा. निलेश महाराज कोरडे यांच्या कीर्तनातील एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये ते सूरजचे कौतुक करताना दिसत आहेत. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणतात की, ‘बिग बॉस’ चांगलं की वाईट हा प्रश्न बाजूला ठेवा. पण इथे बसलेल्या सर्वांना एक वाक्य सांगतो आयुष्यात कधीही आत्महत्येचा विचार मनात आला तर त्या गोलीगत सूरज चव्हाणकडे पाहा आणि कोरोना काळात स्वत:ला संपल्याची जाणीव ज्याला झाली होती तो डीपीदादा म्हणजेच धनंजय पोवार आठवून पाहा. वडील गेले तेव्हा सूरज गोट्या खेळत होता. तेव्हा लोकांनी त्याला येऊन सांगितलं की, तुझे वडील गेले. त्यानंतर त्याने गोट्या तशाच खिशात घातल्या आणि बापाचं शेवटचं तोंड पाहिलं. बिचाऱ्याला तेव्हा काही कळतही नव्हतं. त्यानंतर आईच्या उपचाराला पैसे मिळाले नाहीत. त्याने सगळ्यांकडे पैसे मागितले. पण तेव्हा कोणी पैसे दिले नाही. तेव्हा खोकून खोकून आई गेली पण तो काही करू शकला नाही, असे त्यांनी म्हटले. 

View this post on Instagram
 
A post shared by Suraj Chavan 😎🔥 (@suraj.chavan_fc)

कीतर्नकार प्रा. निलेश महाराज कोरडे यांनी पुढे सांगितले की, “फक्त गणपती बसवायचा म्हणून सूरज तीन दिवस कामाला गेला आणि काबाडकष्ट केले. गणपतीपुरते पैसे जमा केले. पण वेड्याबरोबर काय राहायचं म्हणून गावातल्यांपैकी कुणी गणपती बसवायला आलं नाही. पण त्याने एकट्याने गणपती बसवला आणि त्याच गणपती बाप्पाचा आशीर्वाद पाहा. तिसऱ्या आठवड्यात तो पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा जीवन संपल्याची जाणीव होईल तेव्हा एकदा ‘बिग बॉस’ हा सीझन आठवून पाहा. 

सूरजचे कौतुक करणारी ही व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी सूरजच्या स्ट्रगलचे कौतुक केले असून त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारखं असल्याचे सांगण्यात आले आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?

व्हिडीओ

NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report
Ajit Pawar : तोंडी परीक्षा, उमेदवारीची प्रतीक्षा, इच्छुकांवर प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
Embed widget