Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: मुंबई इंडियन्सचा हादरवणारा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल Playing XI
Mumbai Indians IPL 2026 Team Playing XI: आयपीएल 2026 साठी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज आहे.

IPL 2026 MI Full Squad: आयपीएल 2026 साठी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ हार्दिक पंड्याच्या (Mumbai Indians IPL 2026 Team) नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मैदानात उतरण्यास सज्ज आहे. आयपीएल रिटेन्शन कालावधीत, मुंबईने जास्त खेळाडूंना रिलीज केले नव्हते. त्यामुळे काल दुबईत झालेल्या लिलावाच्या दिवशी मुंबई इंडियन्स संघाला अनेक खेळाडूंवर बोली लावावी लागली नाही.
मुंबई इंडियन्स फक्त 2.75 कोटी रुपयांच्या पर्ससह आयपीएलच्या मिनी लिलावात उतरला होता. यामधून मुंबई इंडियन्सने क्विंटन डी कॉकला 1 कोटी रुपयांना खरेदी केले. दरम्यान, रोहित शर्मासह आता क्विंटन डी कॉक सलामीवीरला मैदानात उतरण्याची शक्यता आहे. डी कॉक यापूर्वी 2019 ते 2021 पर्यंत मुंबई इंडियन्स संघासाठी खेळला होता. गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघ चांगला खेळत नाहीये, पण यावेळी संघ अधिक मजबूत दिसत आहे.
मुंबई इंडियन्सने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी- (MI retained player list)
हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रायन रिकेल्टन, रॉबिन मिंग्ज, मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गफंजार, अश्विनी कुमार, दीपक चहर, विल जॅक्स, रघु शर्मा, राज अंगद बावा.
मुंबई इंडियन्सने पुढील खेळाडूंना रिलीज केले- (MI released player list)
सत्यनारायण राजू, रीस टोपले, केएल श्रीजीथ, कर्ण शर्मा, अर्जुन तेंडुलकर, बेवन जेकब्स, मुजीब उर रहमान, लिझाड विल्यम्स आणि विघ्नेश पुथूर.
मुंबई इंडियन्सने ट्रेडद्वारे खरेदी केलेले खेळाडू- (MI Trade player list)
शेरफेन रदरफोर्ड (गुजरात टायटन्सकडून), मयंक मार्कंडे (केकेआरकडून), शार्दुल ठाकूर (एलएसएलकडून)
आयपीएल 2026 च्या लिलावात मुंबई इंडियन्सने खरेदी केलेल्या खेळाडूंची यादी- (MI IPL 2026 Auction)
क्विंटन डी कॉक- 1 कोटी रुपये
मोहम्मद इझार- 30 लाख रुपये
दानिश मालेवार- 30 लाख रुपये
अथर्व अंकोलेकर- 30 लाख रुपये
मयंक रावत- 30 लाख रुपये
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ- (IPL 2026 MI Full Squad)
हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ, राज बावा, रघू शर्मा, मिशेल सँटनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गफंझार, अश्विनी कुमार, दीपक चहर, विल जैक, शेरफेन रदरफोर्ड, मयंक मारकंडे, शार्दुल ठाकुर, क्विंटन डी कॉक, दानिश मालेवार, मोहम्मद इजहार, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत
आयपीएल 2026 साठी मुंबई इंडियन्सची कशी असेल Playing XI- (MI Playing XI IPL 2026)
रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, मिशेल सँटनर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर.



















