(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TMKOC Sonu : 'तारक मेहता...' मालिकेतून 'सोनू'ला बाहेरचा रस्ता, आता 'ही' नवीन अभिनेत्री साकारणार व्यक्तिरेखा
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील सोनूची व्यक्तिरेखा आता नवीन अभिनेत्री साकारणार आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिका गेल्या 16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या शोची मोठी फॅन फॉलोईंग आहे. गेल्या काही काळापासून 'तारक मेहता...' शो वादात सापडल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही काळात शोच्या निर्मात्यांचा कलाकारांशी वाद होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक कलाकारांनी शो सोडला आहे, तर काहींना निर्मात्यांनीच शोच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
पलक सिंधवानीची मालिकेतून एक्झिट, नव्या 'सोनू'ची एन्ट्री
अलिकडेच 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील भिडे मास्तरची लेक 'सोनू' ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री पलक सिंधवानीने शोला रामराम केला. निर्माते तिचा मानसिक छळ रत तिला त्रास देत असल्याचा आरोपही पलकने केला होता. पलक सिंधवानीने 5 वर्षानंतर हा कार्यक्रम सोडला आहे. पलकने शो सोडल्यानंतर आता 'सोनू'च्या भूमिकेत नवीन अभिनेत्री दिसणार आहे.
ही अभिनेत्री असणार 'तारक मेहता'ची नवीन सोनू
तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेमध्ये सोनू भडे ही भूमिका आता खुशी माळी साकारणार आहे. सोनूची भूमिका साकारण्याबाबत निर्माते असित कुमार मोदींनी यांनी पुष्टी केली आहे. सोनू भूमिकेच्या कास्टिंगबद्दल असित कुमार म्हणाले की, "सोनू टप्पू सेनेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तिच्या उपस्थितीने नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या भूमिकेसाठी खुशी माळी हिची निवड करण्याचा निर्णय फार काळजीपूर्वक रित्या घेण्यात आला आहे. आमचा विश्वास आहे की, ती सोनूची भूमिका चांगल्या प्रकारे साकारेल. आम्ही टीममध्ये खुशीचं स्वागत करण्यास उत्सुक आहोत . आम्हाला आशा आहे की, प्रेक्षकांना गेल्या 16 वर्षांपासून शो आणि त्यातील कलाकारांना जे प्रेम दिलंय, तेच प्रेम प्रेक्षक खुशीलाही देतील".
कोण आहे तारक मेहता का उल्टा चष्मामधील नवीन सोनू?
अभिनेत्री आणि मॉडेल खुशी माळी ही एका टीव्ही मालिकेत झळकली आहे. खुशी माळी हिने 'सिंदूर' टीव्ही मालिकेमध्ये काम केलं आहे. या व्यतिरिक्त ती मॉडेलिंग आणि बर्याच जाहिरातींमध्ये झळकली आहे. खुशी माळीचे इन्स्टाग्रामवर 56 हजार फॉलोअर्स आहेत. खुशी सोशल मीडियावर सक्रीय असते आणि चाहत्यांसोबत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :