एक्स्प्लोर
टेलिव्हिजन विश्वातील सौंदर्यवतीची 400 जोडी कपड्यांसह 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; तुम्ही ओळखता का हिला?
Bigg Boss 18 Premiere : बिग बॉस मराठीचा दिमाखदार ग्रँड फिनाले सोहळा पार पडला. पण, दुसरीकडे सलमान खान होस्ट करत असलेला बहुचर्चित बिग बॉस 18 चा ग्रँड प्रिमियर पार पडला.
Bigg Boss 18 Premiere
1/12

बिग बॉस 18 च्या घरात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अशीच एक सौंदर्यवती यंदा बिग बॉस 18 मध्ये खेळताना दिसणार आहे.
2/12

सलमान खान होस्ट असलेला बहुचर्चित टीव्ही रिॲलिटी शो 'बिग बॉस 18'चा ग्रँड प्रीमियर सोहळा पार पडला. यावेळी बिग बॉसच्या घरात अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की, अशीच एक टेलिव्हिजन विश्वातील अभिनेत्री या सीझनमध्ये धुमाकूळ घालताना दिसणार आहे.
3/12

जर तुम्ही या सौंदर्यवतीला ओळखलं नसेल तर ही टेलिव्हिजनची लोकप्रिय सौंदर्यवती म्हणजे, नायरा बॅनर्जी.
4/12

जिला तुम्ही 'पिशाचिनी' आणि 'दिव्या दृष्टी' यांसारख्या शोमध्ये आपल्या अभिनयाची जादू पसरवताना पाहिलं असेलच.
5/12

आता ही अभिनेत्री बिग बॉसचं घर गाजवताना दिसणार आहे. नायरानं 100-200 नव्हे तर 400 जोडी कपड्यांसह बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे.
6/12

ट्विटरवरील 'बिग बॉस तक' या हँडलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. ज्यामध्ये नायरा बॅनर्जी शोमध्ये 300-400 जोडी जबरदस्त ड्रेसेससह बिग बॉस 18 च्या घरात पोहोचली आहे.
7/12

आता युजर्स या पोस्टवर विविध प्रकारे कमेंट करत आहेत. काहीजण हा शो वर्षभर चालेल का? अशी विचारणा करत आहेत. तर काहींनी हा शो एकाच आठवड्यात संपू शकतो, अशी कमेंटही केली आहे.
8/12

नायरा बॅनर्जी म्हणजे, टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा. तिचं खरं नाव मधुरिमा. नायरानं आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तेलुगू चित्रपटातून केल्याची माहिती मिळत आहे.
9/12

तेलुगु व्यतिरिक्त नायरा 'काल धमाल मालामाल' या हिंदी चित्रपटातही दिसली आहे.
10/12

image 9
11/12

अभिनेत्री मोठ्या पडद्यावर काही खास दाखवू शकली नसली तरी तिनं टेलिव्हिजनचा पडदा मात्र गाजवला आहे.
12/12

टेलिव्हिजन विश्वात तिनं 'पिशाचिनी' आणि 'दिव्या दृष्टी' या मालिकांमधून खूप प्रसिद्धी मिळवली.
Published at : 07 Oct 2024 06:45 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण






















