Swabhiman Shodh Astitvacha : 'स्वाभिमान' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची भावूक पोस्ट व्हायरल
Swabhiman Shodh Astitvacha : 'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' ही लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
![Swabhiman Shodh Astitvacha : 'स्वाभिमान' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची भावूक पोस्ट व्हायरल Swabhiman Shodh Astitvacha marathi serial latest update know details Swabhiman Shodh Astitvacha : 'स्वाभिमान' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीची भावूक पोस्ट व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/07/10aba00474b61f082a5a7642152796df1683436688844254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Swabhiman Shodh Astitvacha Marathi Serial Latest Update : छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. यातील काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. तर काही मालिका मात्र प्रेक्षकांवर छाप सोडण्यात कमी पडल्या आहे. आता 'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' (Swabhiman Shodh Astitvacha) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' (Swabhiman Shodh Astitvacha) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने या मालिकेतील अभिनेत्री आसावरी जोशी यांनी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खास पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मालिकांमध्ये 'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' या मालिकेचा समावेश आहे. या मालिकेवर कलाकारांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. आसावरी जोशी 'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' या मालिकेत आदिती सूर्यवंशीची भूमिका साकारत आहेत. आसावरीने अनेक दिवसांनी या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.
आसावरीने एक पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की,"आज स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही प्रेक्षकांची लाडकी मालिका निरोप घेत आहे. मला माहिती आहे, माझ्याप्रमाणे तुम्ही सर्वजण खूपच भावुक झाले आहात. आजच या मालिकेचे 700 भाग पूर्ण होत आहेत. या मालिकेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं मनोरंजन करता आलं याचा आनंद आहे. लवकरच एका नवीन मालिकेच्या माध्यमातून तुमच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी मला तुम्हा सर्वांच्या सदिच्छांची गरज आहे...धन्यवाद...".
'स्वाभिमान शोध अस्तित्वाचा' या मालिकेत पूजा बिरारी आणि अभिनेता अक्षर कोठारी मुख्य भूमिकेत आहेत. आसावरी जोशी, अशोक शिंदे, सुरेखा कुडची, प्रसाद पंडित ही कलाकार मंडळीदेखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका नवव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.8 रेटिंग मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी टीआरपीच्या शर्यतीत या मालिकेने बाजी मारली होती. पण आता पुन्हा एकदा टीआरपी घसरल्याने निर्मात्यांनी ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या
World Laughter Day 2023 : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ते 'चला हवा येऊ द्या'; छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना मिळतेय मनोरंजनाची मेजवानी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)