Swabhiman : स्वाभिमान मालिकेत पल्लवी आणि शांतनू अडकले विवाहबंधनात; थाटात पार पडला विवाह सोहळा
लग्नातल्या दोघांच्या पारंपरिक लूकला विशेष पसंती मिळत आहे.
Swabhiman : स्टार प्रवाहवरील स्वाभिमान (Swabhiman) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील पल्लवी आणि शांतनू यांच्या लग्नाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने पाहात होते. तो आता क्षण अखेर आलाय. पल्लवी आणि शांतनू यांचा विवाह सोहळा संपूर्ण कुटुंबाच्या साक्षीने पार पडला आहे. लग्नातल्या दोघांच्या पारंपरिक लूकला विशेष पसंती मिळत आहे. पल्लवी आणि शांतनूच्या आयुष्यात जरी आनंदाचे क्षण आले असले तरी मोठ्या आईच्या मनात मात्र नवं कटकारस्थान सुरू आहे.
सहा महिन्यांच्या आत पल्लवीचे सूर्यवंशी घराण्यासोबत असलेले संबंध तोडायला लावण्याची शपथ मोठ्या आईने घेतली आहे. त्यामुळे स्वाभिमान मालिकेचे यापुढील भाग उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही.
स्वाभिमान या मालिकेमधील पल्लवी ही भूमिका अभिनेत्री पूजा बिरारी ही साकारते. तर शांतनू ही भूमिका अभिनेता अक्षर कोठारी हा साकारतो. मालिकेमधील या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अभिनेत्री दिशा परदेशी ही निहारीका ही भूमिका साकारते.
View this post on Instagram
अभिनेत्री आसावरी जोशी, सुरेखा कुडची, अभिनेते अशोक शिंदे, प्रसाद पंडित हे कलाकार देखील या मालिकेमध्ये महत्त्वाची भूमिका साकारतात.
हेही वाचा :
- Aathva Rang Premacha : 'आठवा रंग प्रेमाचा' सिनेमातील रिंकू राजगुरुचा लूक रिव्हील; ट्रेलर आऊट
- Vikram Box Office Collection : कमल हासनच्या 'विक्रम'चा महाविक्रम; तीन दिवसांत केली 160 कोटींची कमाई
- KK Last Song : 'धूप पानी बहने दे' केके यांचं शेवटचं गाणं रिलीज; चाहते झाले भावूक