एक्स्प्लोर
सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील व्यवस्थेवर सुमीत राघवनची पोस्ट
मुंबई : रंगमंचावरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या कलाकारांना बॅकस्टेजला कसं वावरावं लागतं, याची कल्पना बरेचदा इतरांना नसते. दौऱ्यांच्या निमित्ताने येणारे अनुभव काही कलावंत मुलाखतींच्या माध्यमातून सांगत असतात. प्रसिद्ध अभिनेता सुमीत राघवन यानेही डोंबिवलीतल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील 'अ'व्यवस्थेची दृश्यं फेसबुकवरुन समोर आणली आहेत.
डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात एका कार्यक्रमानिमित्त गेलं असताना आलेले अनुभव सुमीत राघवनने फेसबुकवर व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केले आहेत. 'उत्कृष्ट VIP ROOM. अप्रतिम असा कोंदट सुवास. खरंच हुरूप येतो एक कलावंत म्हणून. नाहीतर ती घाणेरडी लंडनची थिएटर्स..' असं कॅप्शन त्याने व्हिडिओला दिलं आहे.
व्हिडिओमध्ये सुमीत राघवनसोबत त्याची पत्नी चिन्मयी सुमीतही दिसत आहे. सोफ्यावर पडलेलं भोक, भिंतीला पडलेले फोपडे अशा काही गोष्टी दाखवत उपरोधिक शैलीतून सुमीतने नाट्यगृह प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.
सुमीतची फेसबुक पोस्ट :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement