Sukh Mhanje Nakki Kay Asta : कुणीतरी येणार गं... सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरीचं होणार डोहाळे जेवण
शालिनी आणि देवकी डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात एक खास नृत्यही सादर करणार आहेत.
Sukh Mhanje Nakki Kay Asta : सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच या मालिकेच्या कथानकात नवं वळण येणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या सुखाची जयदीप-गौरी आणि संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब आतुरतेने वाट पहाट होते तो क्षण अखेर आलाय. लवकरच शिर्के पाटील कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. या चिमुकल्या पाहुण्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असून मालिकेत लवकरच गौरीच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. माईंच्या आग्रहाखातर पारंपरिक पद्धतीने या डोहाळ जेवणाची तयारी करण्यात आलीय. गौरीच्या आवडत्या पदार्थांची मेजवानी असेलच सोबतीला फुलांच्या दागिन्यांनी गौरीला सजवण्यात आलंय. शालिनी आणि देवकी डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात एक खास नृत्यही सादर करणार आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या या आगामी एपिसोडची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत.
मात्र शुभकार्यात विघ्न आणलं नाही ती शालिनी कसली. गौरीच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात गौरीला जीवे मारण्याचा शालिनीने डाव रचलाय. शालिनीचा हा डाव यशस्वी होणार का? या प्रश्नाचं उत्तर हे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आगमी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहे.
तगडी स्टार कास्ट
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत गिरिजा प्रभू, मंदार जाधव, माधवी निमकर आणि वर्षा उसगावकर हे कालकार प्रमुख भूमिका साकरतात. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत. मालिकेच्या कथानक देखील प्रेक्षकांची मनं जिंकते.
छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती
आई कुठे काय करते, ठिपक्यांची रांगोळी, तू चाल पुढं, मन उडू उडू झालं, फुलाला सुगंध मातीचा, रंग माझा वेगळा या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. 'दार उघड बये' या मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. प्रेक्षक वेगवेगळ्या मालिका आवडीनं पाहतात.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Entertainment News Live Updates 13 September: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
- Brahmastra Box Office Collection Day 4 : 'ब्रह्मास्त्र'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच; चौथ्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई
- Emmy Awards 2022 : ‘स्क्विड गेम’ आणि ‘सक्सेशन’ला सर्वाधिक नामांकनं! ‘स्ट्रेंजर थिंग्स’ आणि ‘ओजार्क’चाही समावेश! पाहा कुणी मारली बाजी...