एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 13 September: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 13 September: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

‘शिवप्रताप गरुडझेप’चा टीझर रिलीज; अमोल कोल्हेंनी शेअर केली पोस्ट

क्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग आता ‘शिवप्रताप गरुडझेप’या चित्रपटामधून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या टीझरनं सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.  नुकतीच अभिनेते अमोल कोल्हे यांनी एक पोस्ट शेअर करुन ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्याची माहिती दिली.

 आलिया-रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र'ची रेकॉर्डब्रेक कमाई; सुपरहिट 'ब्रह्मास्त्र' 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) बहुचर्चित 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. रिलीजच्या तिसऱ्याच दिवशी या सिनेमाने जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. जगभरात 'ब्रह्मास्त्र' सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाने रिलीजआधीच अनेक रेकॉर्ड केले होते. त्यामुळे या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. 'ब्रह्मास्त्र' सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. 'ब्रह्मास्त्र'चे अनेक शो हाऊसफुल्ल जात आहेत. जगभरात हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. अवघ्या तीन दिवसांत या सिनेमाने जगभरात 225 कोटींचा गल्ला जमवला आहे.

जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली पोलिसांकडून समन्स; 14 सप्टेंबरला हजर राहण्याचे निर्देश

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या अनेक दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता दिल्ली पोलिसांकडून जॅकलीनला मनी लाँड्रिंग प्रकरणी समन्स बजावण्यात आला आहे. 14 सप्टेंबरला जॅकलीनला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. जॅकलीनला याआधी 12 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. पण काही कारणांमुळे जॅकलीन आज न्यायालयात जाऊ शकली नाही. त्यामुळे तिला आता 14 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचं समन्स पोलिसांनी दिलं आहे.

'पोन्नियिन सेल्वन' देणार 'ब्रह्मास्त्र'ला टक्कर; रिलीजआधीच केली कोट्यवधींची कमाई

गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिवर दाक्षिणात्य सिनेमांचा दबदबा आहे. दाक्षिणात्य सिनेमांना टक्कर देत बॉलिवूडचा 'ब्रह्मास्त्र' सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तर दुसरीकडे 'ब्रह्मास्त्र'ला टक्कर देत 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) या सिनेमाने रिलीजआधीच कोट्यवधींची कमाई केली आहे. मणिरत्नमच्या 'पोन्नियिन सेल्वन' या सिनेमाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आता या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार, 500 कोटींच्या बजेटमध्ये 'पोन्नियिन सेल्वन' सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.

17:42 PM (IST)  •  13 Sep 2022

Hush Hush Trailer: 'हश हश' सीरिजचा ट्रेलर रिलीज

Hush Hush Trailer : 'हश हश' सीरिजचा ट्रेलर रिलीज ट्रेलर रिलीज झाला आहे. पाहा ट्रेलर:

15:12 PM (IST)  •  13 Sep 2022

Sukh Mhanje Nakki Kay Asta : कुणीतरी येणार गं... सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरीचं होणार डोहाळे जेवण

Sukh Mhanje Nakki Kay Asta : सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच या मालिकेच्या कथानकात नवं वळण येणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या सुखाची जयदीप-गौरी आणि संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब आतुरतेने वाट पहाट होते तो क्षण अखेर आलाय. लवकरच शिर्के पाटील कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

14:27 PM (IST)  •  13 Sep 2022

Plan A Plan B trailer: 'प्लान ए प्लान बी' चा ट्रेलर रिलीज

Plan A Plan B trailer:  प्लान ए प्लान बी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.  हा चित्रपट  30 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 

12:42 PM (IST)  •  13 Sep 2022

Brahmastra : 'ब्रह्मास्त्र'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच; चौथ्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई

Brahmastra Box Office Collection Day 4 :  अभिनेता रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट  (Alia Bhatt) यांच्या  ब्रह्मास्त्र (Brahmastra)  या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील VFX ला आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. चौथ्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जाणून घेऊयात ब्रह्मास्त्रच्या कलेक्शनबाबत...

वाचा सविस्तर बातमी 

12:02 PM (IST)  •  13 Sep 2022

Vijay Deverakonda : लायगर फ्लॉप ठरल्यानंतर विजय देवरकोंडाची पहिली पोस्ट; म्हणाला...

Vijay Deverakonda : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता  विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा लायगर (Liger) हा चित्रपट फ्लॉप ठरला. अनन्या पांडेचा अभिनय आणि कथानक यामुळे हा चित्रपट फ्लॉप ठरला असं अनेकांचे मत आहे. आता लायगर फ्लॉप ठरल्यानंतर विजयनं पहिली पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टला विजयनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..ABP Majha Marathi News Headlines 10PM TOP Headlines 10 PM 19 January 2024Special Report Bharat Gogwale And Dada Bhuse : दिल है की मानता नहीं.., पालकमंत्रीपदाचा अभाव, नाराजीचा प्रभाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget