एक्स्प्लोर

Shashank Ketkar On Mumbai Roads Potholes Drainage: 'हा रस्ता माझ्या एकट्याच्या बापाचा नाही...'; मराठी अभिनेता खूप चिडला, थेट पुरावा देतच आगपाखड VIDEO

Shashank Ketkar On Mumbai Roads Potholes Drainage: आपल्या देशात आपल्या जीवाची किंमत शून्य आहे याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय येतो, असं शशांक म्हणालाय. तसेच, शशांकनं तो मांडत असलेल्या मुद्द्यांवर चिडवणाऱ्या त्याच्या मित्रांनाही सुनावलं आहे.

Shashank Ketkar On Mumbai Roads Potholes Drainage: 'होणार सून मी ह्या घरची' (Honaar Soon Mee Hyaa Gharchi), 'मुरांबा' (Muramba) यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला मराठी अभिनेता (Marathi Actor) शशांक केतकर (Shashank Ketkar) सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच सक्रिय असतो. शशांक केतकर नेहमीच अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवर व्यक्त होत असतो. यापूर्वीही शशांकनं अनेक सामाजिक गोष्टी आणि सभोवतालच्या अनेक मुद्द्यांवर भाष्य करत थेट सरकारवर ताशेरे ओढले आहेत. आता शशांकनं त्याच्या इन्स्टा हँडलवरुन एक नवा व्हिडीओ शेअर करुन मुंबईतले रस्ते, खड्डे आणि उघडी गटारं यावर भाष्य केलं आहे.  

शशांकनं व्हिडीओ शेअर करत'मड आयलंड' च्या रस्त्यांची दयनीय अवस्था दाखवली आहे. तसेच, यावरुन सरकारवर पुन्हा ताशेरे ओढले आहेत. आपल्या देशात आपल्या जीवाची किंमत शून्य आहे याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय येतो, असं शशांक म्हणालाय. तसेच, शशांकनं तो मांडत असलेल्या मुद्द्यांवर चिडवणाऱ्या त्याच्या मित्रांनाही सुनावलं आहे. हा रस्ता माझ्या एकट्याचा बापाचा नाही. तुमच्याही बापाचा नाही. हा आपल्या देशाचा रस्ता आहे, असं शशांकनं म्हटलंय.  

व्हिडीओ शेअर करताना शशांक काय म्हणाला?

अभिनेता शशांक केतकरनं व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शन लिहिलंय की, "Highway असो वा शहरातला, गावातला छोटा रस्ता… प्रवास करणारा जिवंत माणूस असतो. अनेक चालक नियम पाळत नाहीत मान्य आहे पण या अशा उघड्या गटारांचं काय करायचं? या गटारांमुळे अपघात झाला, जीव गेला तर जबाबदार कोण ? की मुंबईच स्पिरिट या नावाखाली हेही सहन करायचं आम्ही? शेवटी आपल्या देशात आपल्या जीवाची किंमत शून्य आहे याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय येतो. आपली लोकसंख्याच इतकी आहे की, या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं तर काय बिघडलं! बरोबर? यावर तातडीने ऍक्शन घेतली जाईल आणि संभाव्य अपघात टाळले जातील. माझा तुमच्यावर विश्वास आहे..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

मराठी अभिनेता शशांक केतकर नेमकं काय म्हणाला? 

अभिनेता शशांक केतकर म्हणाला की, "या देशातील रस्ते, रस्त्यांची एकंदर परिस्थिती हा फारच गमतीशीर विषय आहे. मला त्याबद्दल कायमच बोलायला आवडतं. कारण, हा देश माझा आहे. या देशातील रस्ते माझे आहेत आणि या रस्त्यांवरती माझ्या पैशाने विकत घेतलेली महागडी गाडी मी स्वत: चालवणार आहे..."

पुढे बोलताना शशांक केतकर म्हणाला, "आजचा विषय आहे मडचा रस्ता. आजचा मुद्दा मांडण्याआधी एक डिसक्लेमर देतो. इंडस्ट्रीमधील माझा असा एक मित्र परिवार आहे. जो मला चिडवत असतो की, आला आमचा म्होरक्या आला. हा सगळ्या रस्त्यांबद्दल बोलणार. यालाच सगळे खड्डे दिसतात. त्यांना मला एकच सांगायचं आहे की, मित्रांनो या रस्त्यावरती फक्त मी एकटा गाडी चालवणार नाही. कारण हा रस्ता माझ्या एकट्याचा बापाचा नाही. तुमच्याही बापाचा नाही. हा आपल्या देशाचा रस्ता आहे. शूटिंगसाठी जसं मी इथे येतो, तसं तुम्हीसुद्धा येता. उद्या माझी गाडी त्या खड्ड्यामध्ये गेली, माझ्या गाडीचं काही नुकसान झालं तसं परवा तुमच्याही गाडीचं नुकसान होऊ शकतं आणि ते होऊ नये म्हणून माझा कायम प्रयत्न असतो. तर मी जर तुमचा म्होरक्या असणार असेन, तर असू दे. तुम्ही बोलत नसाल, तर मलाही हे बोलू दे..."

"इथे किती कायदेशीर आणि किती बेकायदेशीर काम चालतं..."

"मडचा रस्ता हा आजचा विषय आहे. मड आयलंडला जाणारा जो रस्ता आहे, अनेक दशकं तो रस्ता झालेला नव्हता. त्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या. त्यामध्ये गावकऱ्यांची वेगळी मागणी होती, शूटिंग करणाऱ्यांची वेगळी मागणी होती. इथे किती कायदेशीर आणि किती बेकायदेशीर काम चालतं, हा विषय वेगळा आहे. पण, तुम्हाला डेव्हलपमेंट करायची आहे, पण त्यासाठी लोकांनी गैरसोय सहन करा, याची एका तराजूमध्ये तुलना होऊ शकत नाही. जर तुम्हाला विकास करायचा असेल, इकडे एक वेगळी इंडस्ट्री उभी करायची असेल, गावकऱ्यांना एक सुखी आयुष्य द्यायचं असेल तर तुम्हाला विकास करावा लागणार आहे. ते करण्याकडे तुम्ही लक्ष द्या. जो अनेक दशके रस्ता झालेला नव्हता, त्याचं गेली एक-दोन वर्षे काम चालूच आहे. 50-60 टक्के रस्ता पूर्ण केलेला आहे...", असं शशांक केतकर म्हणाला. 

"जो तयार झालेला रस्ता आहे. त्यामध्ये ड्रेनेजला लोखंडी झाकणं लावलेली आहेत. ती इतकी ताकदवान आहेत की, ट्रक सोडाच. पण, सायकल त्याच्यावरुन गेली तरी तुटतील. तर त्याचं उदाहरण बघा...", असं शशांक म्हणाला. पुढे तो म्हणालाय की, "मागच्या एक दीड आठवड्यांपासून या ड्रेनेजची अवस्था अशीच आहे आणि महानगरपालिकेचं हे म्हणणं असेल की, आम्ही काम करणारच आहोत, म्हणून नारळाची झावळी खोचून ठेवली आहे. तर तुमची अॅक्शन कमाल आहे. आमच्या महागड्या गाड्यांचं चाक जर त्यामध्ये गेलं, तर त्या गाड्या अडकून पडणार आहेत. आमच्या गाडीला डॅमेज होणार आहे. तर महानगरपालिकेला माझी विनंती आहे की आमचं जे काही डॅमेज होईल, ते भरण्याची जबाबदारी तुम्ही घ्या. एखादा बाईक चालवणारा तिथून गेला, तर त्याच्या जीवाची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का?"

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Prince Narula Fans Giving Threat To Divya Agarwal: '10 मुलं घेऊन...', ज्याला भाऊ मानलं, त्याचेच फॅन्स देतायत अत्याचाराच्या धमक्या; अभिनेत्रीकडून घाणेरड्या मेसेजचे स्क्रिनशॉर्ट शेअर

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Toxic Fame Actor Yash: 14 मिलियनहून अधिक फॉलोअर्स, 'टॉक्सिक' फेम यश एकाच व्यक्तीला करतो फॉलो; इंटीमेट सीन व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण, 'ती' एकमेव व्यक्ती कोण? 
14 मिलियनहून अधिक फॉलोअर्स, 'टॉक्सिक' फेम यश एकाच व्यक्तीला करतो फॉलो; इंटीमेट सीन व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण, 'ती' एकमेव व्यक्ती कोण? 
Emraan Hashmi Awarapan 2: इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Embed widget