एक्स्प्लोर

Anup Soni On Akshaye Khanna Acting: 'अक्षय खन्नाला मी अॅक्टिंग शिकवलीय...'; अभिनेत्याच्या दाव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या, म्हणाला, 'त्याची विचारसरणी...'

Anup Soni On Akshaye Khanna Acting: अक्षय खन्ना हा आपला विद्यार्थी होता आणि आपण त्याला अभिनयाचे धडे दिले आहेत, असा दावा एका अभिनेत्यानं केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Anup Soni On Akshaye Khanna Acting: 'छावा' (Chhaava) आणि त्यानंतर 'धुरंधर' (Dhurandhar) या सिनेमांच्या यशानंतर, अभिनेता अक्षय खन्नानं (Akshaye Khanna) आपल्या दमदार अभिनयानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला. सिनेसृष्टीपासून ते सोशल मीडियापर्यंत सगळीकडे त्याचीच चर्चा रंगलेली. त्यानं साकारलेल्या 'छावा'मधला औरंगजेब आणि 'धुरंधर'मधल्या 'रहमान डकैत'नं सर्वांना भूरळ घातली. पण, याच दरम्यान अक्षयच्या नावापुढे एक कॉन्ट्रोवर्सी जोडली गेली. अक्षय खन्नानं 'दृश्यम 3' (Drishyam 3) सिनेमा सोडल्याचं समोर आलं. यासाठी अक्षय खन्नाच्या डोक्यात हवा गेलीय, आता त्याला जास्त पैसे हवेत, अशी अनेक कारणंही सांगितली गेली. अशातच आता अक्षय खन्ना पुन्हा एकदा 'धुरंधर: द रिवेंज' (Dhurandhar: The Revenge) सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. पण, ज्या अक्षय खन्नाच्या अभिनयावर सारे फिदा झालेत, त्याला अभिनय शिकवल्याचा दावा एका अभिनेत्यानं केला आहे. अभिनेत्याचं वक्तव्य ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान, 'अपहरण' (Apharan) आणि 'सत्यमेव जयते 2' (Satyameva Jayate 2) सारख्या सिनेमांसाठी ओळखला जाणारा अभिनेता अनुप सोनीनं (Anup Soni) असा दावा केला आहे की, त्यानंच अक्षय खन्नाला अभिनयाचे धडे दिले आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anup Soni (@anupsoni3)

अभिनेता अनुप सोनी नेमकं काय म्हणाला? 

एका मुलाखतीत बोलताना अभिनेता अनुप सोनीनं अक्षयच्या स्ट्रगल आणि यशाबद्दल भाष्य केलं. तसेच, आपणच त्याला अभिनय शिकवल्याचा दावाही केला. तो म्हणाला की, "मी अक्षयसोबत अनेक अभिनय वर्ग घेतले आहेत. मी त्याला अभिनय शिकवलाय. त्याचा आजचा हा यशस्वी प्रवास पाहून मला मनापासून आनंद होतोय. अक्षयची विचारसरणी नेहमीच स्पष्ट होती आणि मी नेहमीच त्याचं कौतुक केलंय...".

"अक्षय आता अशा टप्प्यावर पोहोचला आहे, जिथे तो चित्रपट निर्मात्यांसाठी अत्यंत विश्वासार्ह अभिनेता बनला आहे. कोणत्याही भूमिकेत तो चपखल बसतो आणि हीच एका चांगल्या अभिनेत्याची ओळख आहे. त्याने सुरुवातीला लहान आणि मध्यवर्ती भूमिकांमधून अनुभव घेतला आणि आता तो जे काम करतोय ते खरोखरच आश्चर्यकारक आहे...", असं अनुप सोनी म्हणाला. 

दरम्यान, 'धुरंधर: द रिव्हेंज'सोबतच 2026 मध्ये अक्षय खन्ना इतरही प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. अक्षय खन्ना लवकरच 'इक्का' सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तो सनी देओलसोबत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. याव्यतिरिक्त अक्षय खन्ना 'महाकाली' साऊथ सिनेमातही दिसणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shashank Ketkar On Mumbai Roads Potholes Drainage: 'हा रस्ता माझ्या एकट्याच्या बापाचा नाही...'; मराठी अभिनेता खूप चिडला, थेट पुरावा देतच आगपाखड VIDEO

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepika Padukone: पहिल्या प्रेग्नेंसीवेळी कल्कीतील भूमिकेसाठी शूट; दुसरं बाळ पोटात असताना दीपिका पदुकोण करणार 'हा' Action चित्रपट
पहिल्या प्रेग्नेंसीवेळी कल्कीतील भूमिकेसाठी शूट; दुसरं बाळ पोटात असताना दीपिका पदुकोण करणार 'हा' Action चित्रपट
Mahavtar Parshuram:4000 कोटींच्या रामायणाच्या चर्चेत भव्य पौराणिक सिनेमाची घोषणा; विकी कौशलचं अंगावर काटा आणणारं पोस्टर
4000 कोटींच्या रामायणाच्या चर्चेत भव्य पौराणिक सिनेमाची घोषणा; विकी कौशलचं अंगावर काटा आणणारं पोस्टर
Bigg Boss Marathi: '...नाही तर, मीच जिंकलो असतो'; बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच विशाल कोटियन काय म्हणाला?
'...नाही तर, मीच जिंकलो असतो'; बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच विशाल कोटियन काय म्हणाला?
Bhoot Bangla: पुन्हा एकदा हवेलीतल्या हॉरर कॉमेडीचा बॉक्स ऑफिसवर थरार; 3 दिवसांत किती कोटींची कमाई?
पुन्हा एकदा हवेलीतल्या हॉरर कॉमेडीचा बॉक्स ऑफिसवर थरार; 3 दिवसांत किती कोटींची कमाई?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात; 20 ठार 30 जखमी, प्रशासन घटनास्थळी
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात; 20 ठार 30 जखमी, प्रशासन घटनास्थळी
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
Ameet Satam BMC Fund Allocation: BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?
BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
IPL 2026: सचिन, सेहवाग, धोनीसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं नेमकं काय घडलं?
सचिन, सेहवाग, धोनीसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं नेमकं काय घडलं?
Supriya Sule and Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरे फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शक्य असेल...'
प्राजक्त तनपुरे फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शक्य असेल...'
Rashid Khan: 'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
Kolhapur Crime: ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
Embed widget