(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Emmy Awards 2022 : ‘स्क्विड गेम’ आणि ‘सक्सेशन’ला सर्वाधिक नामांकनं! ‘स्ट्रेंजर थिंग्स’ आणि ‘ओजार्क’चाही समावेश! पाहा कुणी मारली बाजी...
Emmy Awards 2022 : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील मायक्रोसॉफ्ट थिएटरमध्ये 74व्या एमी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Emmy Awards 2022 : अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील मायक्रोसॉफ्ट थिएटरमध्ये 74व्या एमी पुरस्कार सोहळ्याचे (Emmy Awards 2022 ) आयोजन करण्यात आले आहे. पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण अमेरिकेतील एनबीसी आणि पीकॉक टीव्हीवर होत असताना, भारतातही हा पुरस्कार सोहळा आज थेट पाहता येत आहे. या पुरस्कार सोहळ्यात 'सक्सेशन' (Sucession) या वेबसीरिजला 25 नामांकन मिळाले आहेत. तर, ‘स्क्विड गेम: द चॅलेंज' (Squid Game: The Challenge) या वेबसीरिजच्या चाहत्यांसाठीदेखील एक आनंदाची बातमी आहे. या वेबसीरिजला सर्वोत्कृष्ट नाट्य या विभागासह आणखी 13 नामांकन जाहीर झाले आहेत.
एमी पुरस्कार सोहळ्यात (Emmy Awards 2022 ) सर्वोत्कृष्ट टीव्ही शो, अभिनेते आणि तंत्रज्ञ यांना पुरस्कार दिले जातात. यंदा ‘सक्सेशन’ शोला बेस्ट ड्रामासह सर्वाधिक 25 नामांकने मिळाली आहेत, तर नेटफ्लिक्सने स्ट्रीम केलेले शो Stranger Things, Squid Game आणि Ozark यांचाही नामांकन यादीत समावेश आहे.
'स्क्विड गेम’ सर्वाधिक नामांकनं मिळवणारी पहिली ‘नॉन-इंग्लिश’ सीरिज
'स्क्विड गेम: द चॅलेंज' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रेक्षकांमध्ये या वेबसीरिजची चांगलीच क्रेझ पाहायला मिळाली. ही कोरिअन वेबसीरिज आता एमी पुरस्कारांच्या यादीत सामिल झाली आहे. नेटफ्लिक्सवरील ही सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिज ठरली आहे. नऊ भागांची ही वेबसीरिज 12 सप्टेंबर 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. रिलीजच्या चार आठवड्यातच वेबसीरिजला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहे.
कुणी कुणी मारली बाजी?
* अमेरिकन अभिनेत्री शेरिल ली राल्फ हिला विनोदी चित्रपट श्रेणीतील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा एमी पुरस्कार पटकावला आहे.
* अभिनेत्री आआंद ज्युलिया गार्नरला ‘ओझार्क’ या सीरिजसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री श्रेणीमध्ये एमी पुरस्कार मिळाला.
* 25 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकनांसह एमी अवॉर्ड्समध्ये इतिहास रचणाऱ्या एचबीओच्या ‘सक्सेशन’साठी मॅथ्यू मॅकफॅडन यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा एमी पुरस्कार मिळाला.
* जॉन ऑलिव्हरने ‘लास्ट वीक टुनाईट’साठी एमी अवॉर्ड जिंकला. या विभागात ‘द डेली शो विथ ट्रेवर नोह’, ‘लेट नाईट विथ सेथ मेयर्स’, ‘द लेट शो विथ स्टीफन कोल्बर्ट’ यांना देखील नामांकन मिळाले होते.
* अभिनेत्री अमाडा सेफ्रीडने ‘ड्रॉपआउट’ सीरिजसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावल आहे. या विभागात तिच्यशिवाय टोनी कोलेट, ज्युलिया गार्नर, लिली जेम्स, सारा पॉलसन, मार्गारेट क्वाली या अभिनेत्रींना देखील नामांकन मिळाले होते.
* अमेरिकन अभिनेत्री जेनिफर कूलिजने ‘द व्हाईट लोटस’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.
* अभिनेता ब्रेट गोल्डस्टीनला कॉमेडी सीरिज ‘टेड लासो’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
* ‘वॉच आऊट फॉर द बिग गर्ल्स’साठी सर्वोत्कृष्ट रिअॅलिटी शो विभागात लिझोने एमी पुरस्कार पटकावला.
* ‘व्हाईट लोटस’साठी माईक व्हाईटला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार देण्यात आला.
* जेरॉड कारमायकलला त्याच्या ‘जेरॉड कारमायकल: रोथॅनियल’साठी व्हरायटी स्पेशलमध्ये सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार देण्यात आला.
* Apple TV Plusच्या ‘टेड लासो’ कॉमेडी सीरिजसाठी जेसन सुडेकिसने मुख्य अभिनेता म्हणून दुसऱ्यांदा एमी पुरस्कार जिंकला.
* अभिनेत्री झेंडायाला ‘युफोरिया’ या ड्रामा सीरिजसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा एमी पुरस्कार मिळाला.
* अभिनेत्री जीन स्मार्टला कॉमेडी सीरिज ‘हॅक्स’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
* कोरियन ड्रामा सीरिज ‘स्क्विड गेम’साठी अभिनेता ली जंग जे याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.
* ह्वांग डोंग-ह्युक यांना ‘स्क्विड गेम’ या ड्रामा सीरिजच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी एमी पुरस्कार मिळाला.
* ‘व्हाईट लोटस’ला ‘बेस्ट लिमिटेड ऑर अँथॉलॉजी’ विभागात सर्वोत्कृष्ट सीरिजचा पुरस्कार मिळाला.
* 'टेड लासो'ला सर्वोत्कृष्ट विनोदी सीरिजसाठी एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
* एमी अवॉर्ड्सच्या नामांकन यादीमध्ये ‘सॅक्सेशन’ या ड्रामा सीरिजने 25 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आपले स्थान निर्माण केले होते. आता ‘सॅक्सेशन’ला सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिज म्हणून एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा :
Emmy Awards 2022 : 74 व्या एमी पुरस्काराचे नामांकन जाहीर; 12 सप्टेंबरला पार पडणार पुरस्कार सोहळा