एक्स्प्लोर

Brahmastra Box Office Collection Day 4 :  'ब्रह्मास्त्र'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच; चौथ्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई

चौथ्या दिवशी देखील ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे.

Brahmastra Box Office Collection Day 4 :  अभिनेता रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट  (Alia Bhatt) यांच्या  ब्रह्मास्त्र (Brahmastra)  या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील VFX ला आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. चौथ्या दिवशी देखील या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जाणून घेऊयात ब्रह्मास्त्रच्या कलेक्शनबाबत...

चौथ्या दिवशी केली कोट्यवधींची कमाई
सोमवारी (12 सप्टेंबर) म्हणजेच चौथ्या दिवशी ब्रह्मास्त्र या चित्रपटानं भारतातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 16 कोटींची कमाई केली आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 37 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 42 कोटींची कमाई केली. रविवारी या चित्रपटानं  45 कोटी कमावले. चार दिवसांमध्ये या चित्रपटानं जवळपास 140 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. 

काहींना आवडला तर काहींची नापसंती 

अनेक नेटकरी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ब्रह्मास्त्र चित्रपटाचं कौतुक करत आहेत. काहींना हा चित्रपट आवडला आहे तर काहींची या चित्रपटाला नापसंती मिळाली आहे.  चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या भूमिकेनं अनेकांचे लक्ष वेधले. रणबीर आणि आलिया यांच्यासोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि  मौनी रॉय या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.  ब्रह्मास्त्र या चित्रपटातील 'केसरिया', देवा देवा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील आलिया आणि रणबीरच्या केमिस्ट्रीनं देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अयान मुखर्जीनं केलं आहे. 

बॉयकॉट हॅशटॅग झाला होता ट्रेंड

ब्रह्मास्त्र हा चित्रपट रिलीज होण्याच्या आधी 'बॉयकॉट ब्रह्मास्त्र' हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. अनेक नेटकरी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत होते. या ट्रेंडचा परिणाम चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होईल, असं म्हटलं जात होतं. पण चित्रपटाच्या कलेक्शनवर या ट्रेंडचा परिणाम झाला नसून चित्रपट सध्या कोट्यवधींची कमाई करत आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होताMihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी
पुण्यातील जुन्नरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; 2 ठार 15 जखमी
Embed widget