'तुम्हाला त्याच्यासोबत दारू प्यायला बसायचं का? अभिनेत्री उषा नाडकर्णी नेटीझन्सवर संतापल्या, स्पष्टच बोलल्या
Usha Nadkarni Breaks Silence on Social Media: उषा नाडकर्णी यांनी वैयक्तिक प्रश्नावर सडेतोड उत्तर दिलं आहे.

Usha Nadkarni slams trolls asking about her husband: मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी अनेक चित्रपट आणि मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तसेच रिअॅलिटी शोमधूनही त्यांनी आपला हटके अंदाज दाखवला. त्या आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी केलेल्या वक्तव्यांची प्रचंड चर्चा होते. माहेरची साडी, सिंहासन, देऊळ, व्हेंटिलेटर या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. तर, पवित्रा रिश्ता या मालिकेमुळे त्यांनी हिंदी टीव्ही विश्वात विशेष ओळख मिळाली. तसेच बिग बॉस मराठी सिझन 3 मध्येही त्या दिसल्या होत्या. दरम्यान, अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी आपल्या पतीविषयी भाष्य केलं आहे.
काही दिवसांपूर्वी उषा नाडकर्णी यांनी राजश्री मराठीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी प्रोफेशनलसह काही वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीतील काही माहित नसलेले किस्सेही शेअर केले आहेत. त्यांनी या मुलाखतीत आपल्या पतीबद्दल आणि सोशल मीडियाबद्दलही वक्तव्य केलं आहे. तसेच रिटायरमेंटबाबतही भाष्य केलं आहे.
सोशल मीडियाबाबत उषा नाडकर्णी म्हणाले, 'सोशल मीडिया हे वेड्यांनी भरलेलं आहे. इथे अनेकांना ट्रोल केलं जातं. तर, मला असं वाटतं की, कशाला कुणाबद्दल बोलायचं? ज्यांना जे काही वाटतं, ते करतात. बघायचं असेल तर बघायचं नाही तर राहु द्याचं' , असं सोशल मीडियाबाबत त्यांनी मत व्यक्त केलं. आपल्या पतीबाबत उषा नाडकर्णी म्हणाले, 'काही मुलाखतींमध्ये फोटो दाखवताना मी माझ्या नवऱ्याचे फोटो दाखवले नाहीत. अनेकांनी त्यावर नवरा कुठे आहे? असं विचारलं होतं. तो प्रश्न मी सोशल मीडियात वाचला. तर, तेव्हा मला असा प्रश्न पडला की, तुम्हाला काय त्याच्याबरोबर दारु पिण्यासाठी बसायचं आहे का? तुम्हाला काय करायचं आहे? मी देखील सोशल मीडिया वापरते', असं म्हणत उषा नाडकर्णी यांनी नेटकऱ्यांना फटकारलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या घरात हलला पाळणा; अभिनेत्रीनं दिला मुलीला जन्म, गोंडस बाळाचे PHOTOs





















