Satyavan Savitri : 'सत्यवान सावित्री' नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला; वेदांगी कुलकर्णी दिसणार मुख्य भूमिकेत
Satyavan Savitri : 'सत्यवान सावित्री' ही मालिका 12 जून 2022 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Satyavan Savitri : 'सत्यवान सावित्री' नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला; वेदांगी कुलकर्णी दिसणार मुख्य भूमिकेत Satyavan Savitri new serial to the audience Vedangi Kulkarni will be seen in the lead role Satyavan Savitri : 'सत्यवान सावित्री' नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला; वेदांगी कुलकर्णी दिसणार मुख्य भूमिकेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/31/4fd7792da16f43d59e6772ea7de3c5a7_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Satyavan Savitri : 'सत्यवान सावित्री' (Satyavan Savitri) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी (Vedangi Kulkarni) सावित्रीचे पात्र साकारणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 12 जून पासून ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सावित्रीच्या बालपणीचा प्रवास उलगडणार
'सत्यवान सावित्री' या मालिकेत सावित्रीच्या बालपणीचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. बालपणीच्या सावित्रीच्या भूमिकेत बालकलाकार राधा धारणे दिसणार आहे. तर तरूणपणीच्या सावित्रीची भूमिका अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी निभावताना दिसणार आहे. तसेच सत्यवानच्या भूमिकेत आदित्य दुर्वे दिसणार आहे.
'गोष्ट यमाकडून सत्यवानाचे प्राण परत घेऊन येणाऱ्या सावित्रिची' असे म्हणत या मालिकेचा प्रोमो आऊट करण्यात आला आहे. वेदांगी कुलकर्णी या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत असल्यामुळे वेदांगीसाठी ही मालिका खास आहे. बालपणीची सावित्री आणि तरुणपणीची सावित्री अशी सावित्रीची दोन रुपं प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहेत.
View this post on Instagram
'मन झालं बाजींद' ही मालिका घेणार निरोप
'सत्यवान सावित्री' ही मालिका 12 जून 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे 'मन झालं बाजींद' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेला टीआरपी मिळत नसल्याने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मालिकेत सतत वेगवेगळी कारस्थानं दाखवण्यात येत होती. त्यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेवर नाराजी दर्शवली आहे.
वेदांगी कुलकर्णी याआधी 'साथ दे तू मला' या मालिकेत मुख्य भूमिकेत होती. तसेच ती अनेक नाटक, वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तसेच डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमातदेखील वेदांगी सहभागी झाली होती. वेदांगी नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. 'सत्यवान सावित्री' ही वेदांगीची लग्नानंतरची पहिलीच मालिका आहे. या मालिकेत वेदांगी आदित्यसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. आदित्यची मुख्य भूमिका असलेली ही दुसरीच मालिका आहे.
कुठे पाहता येईल? झी मराठी
किती वाजता पाहायला मिळेल? संध्याकाळी 7 वाजता
संबंधित बातम्या
Majhi Tujhi Reshimgath : यश जाणार पॅलेस सोडून चाळीत राहायला; परीचं पत्र वाचून आजोबांच्या मनाला फुटणार का पाझर?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)