एक्स्प्लोर

किशोरी आमोणकर यांचं निधन, दिग्गजांची श्रद्धांजली

मुंबई : गेली अनेक दशकं आपल्या गायकीने संगीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचं वयाच्या 85 व्या वर्षी राहत्या घरी निधन झालं. किशोरीताईंच्या निधनानं भारतीय शास्त्रीय संगीतातील विद्यापीठ हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 10 एप्रिल 1931 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आई मोगूबाई कुर्डीकर या प्रख्यात शास्त्रीय गायिका होत्या. किशोरीताईंनी आईकडून तसंच विविध घराण्यांच्या गुरुंकडून संगीताचं शिक्षण घेतलं. ख्याल गायकी बरोबरच ठुमरी, भजन गायनात किशोरीताईंनी आपल्या शैलीची मुद्रा उमटवली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्यापासून लता मंगेशकर शंकर महादेवन यांनी किशोरी आमोणकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केलं. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी किशोरी आमोणकर यांना श्रद्धांजली वाहिली. लता मंगेशकर महान शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांच्या निधनाने अतिव दु:ख झालं. त्या असाधारण गायिका होत्या. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीत जगताचं मोठी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. https://twitter.com/mangeshkarlata/status/848968474080751616 राहुल देशपांडे किशोरीताई या जगात नाही, यावर विश्वासच बसत नाही. किती आनंद दिलाय तुम्ही. हे सत्य पचवणं जड जात आहे आहे, भावपूर्ण श्रद्धांजली https://twitter.com/deshpanderahul/status/849105171300982785 शंकर महादेवन महान गायिका किशोरी आमोणकर यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने भारतीय शास्त्रीय संगीताचं मोठं नुकसान झालं. त्यांचं संगीत कायम अजरामर राहिल. https://twitter.com/Shankar_Live/status/848970666330267648 नरेंद्र मोदी किशोरी आमोणकर यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीताचं अपरिमीत नुकसान झालं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. किशोरी आमोणकर यांचं कार्य लोकांच्या मनात कायम राहिल. https://twitter.com/narendramodi/status/849099149362556928 https://twitter.com/narendramodi/status/849099274247917576 शरद पवार किशोरीताई आमोणकर यांच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विशुद्ध सूर हरपला. किशोरीताईंच्या सुरांचा मी स्वतः एक निःसीम चाहता, त्यामुळे किशोरीताईंच्या जाण्याने संगीत रसिकांना झालेल्या दुःखाची व भारतीय शास्त्रीय संगीतक्षेत्रात निर्माण झालेल्या पोकळीची कल्पना येऊ शकते. https://twitter.com/PawarSpeaks/status/849105318684393472 देवेंद्र फडणवीस किशोरीताई आमोणकर यांच्या निधनाने प्रयोगशीलता व संवेदनांना जपणाऱ्या एका ख्यातनाम आणि महान शास्त्रीय गायिकेला आपण मुकलो आहोत. किशोरीताई भावप्रधान गायिका होत्या. गीत किंवा भजन, श्रोत्यांना त्यांनी श्रवणानंदच दिला. येथेच न थांबता संगीतावरील ग्रंथही त्यांनी लिहिला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या आप्त-रसिक चाहत्यांना मिळो,अशी प्रार्थना करतो https://twitter.com/Dev_Fadnavis/status/848983467610132481 https://twitter.com/Dev_Fadnavis/status/848983886168154112 https://twitter.com/Dev_Fadnavis/status/848984138325516288 विनोद तावडे गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या निधनाने हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील तपस्वी गायिका आपण गमविली आहे. किशोरीताई या भारतीय शास्रीय संगीताचं एक अधिष्ठान होत्या. शास्त्रीय संगीताचे सूर रसिकांसमोर उलगडून दाखविण्याचे सामर्थ्य त्यांच्या गायनामध्ये होते. सच्च्या आणि निर्भेळ सुरांवरची श्रद्धा यामुळे गानसरस्वती गायकी अलौकिक बनली. जगभरातल्या श्रोत्यांवर त्यांच्या सुरांनी मोहिनी टाकली होती. कुमार केतकर किशोरी आमोणकर यांच्या गाण्यात एक प्रकारचं विलक्षण अध्यात्म होतं. ज्यांना योगी पुरुषाचं किंवा हिमालयात जाणाऱ्या ऋषी मुनींचं अध्यात्म मान्य नसेल, त्यांना किशोरी आमोणकरांचं गाणं हेच अध्यात्म होतं. माझ्या दृष्टीने तोच चैतन्याचा साक्षात्कार होता. गिरीश कुबेर ही अतिशय दु:खद घटना आहे. तांत्रिकदृष्ट्या त्या जयपूर अंत्रोली घराण्याच्या गायिका म्हणून त्यांचं वर्णन करता येईल. पण घराण्याच्या पलिकडे जाऊन त्यांनी इतर घराण्याचं सौंदर्य स्वत:च्या गाण्यात आणलं. हे अत्यंत अभूतकार्य त्यांच्याकडून घडलं, असं म्हणता येईल. संबंधित बातम्या ‘गानसरस्वती’ किशोरी आमोणकर काळाच्या पडद्याआड 'गानसरस्वती'ला संगीत जगतातील मान्यवरांची आदरांजली सरस्वतीच्या विणेप्रमाणे झंकारणारा किशोरी आमोणकरांचा स्वर!
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
Maharashtra Live Updates: अकोल्यात प्रचाराचा पहिलाच 'सुपर संडे' गाजणार, देवेंद्र फडणवीस आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या तोफा धडाडणार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Embed widget