Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' उत्कंठावर्धक वळणावर; कार्तिक घेणार दीपाचा जीव?
Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.
Rang Maza Vegla Marathi Serial Latest Update : 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. कार्तिक-दीपाच्या नात्याची आता नव्याने सुरुवात होणार ती तो तिचा जीव घेणार हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
'रंग माझा वेगळा' या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. दीपाने आता कार्तिकला धडा शिकवण्याचं ठरवलं आहे. कार्तिक दीपाला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तिच्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नव्हतं. पण अखेर दीपाला कार्तिकचं सत्य कळलं आहे. 14 वर्षांची शिक्षा भोगून आल्यानंतर कार्तिक दीपासोबत खोटं बोलत होता. पण आता हे सत्य दीपाला कळलं आहे.
View this post on Instagram
आपल्याला वेड लागलेलं नसून हा कार्तिकचा प्लॅन आहे, हे दीपाच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे दीपा आता मालिकेच्या आगामी भागात कार्तिकला त्याच्याच भाषेत उत्तर देताना दिसणार आहे. कार्तिक दीपाला डेटवर घेऊन जाणार आहे. दरम्यान तो तिचा जीव घ्यायचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे कार्तिकच्या मनातील गोष्टी त्याच्या ओठांवर आणण्यासाठी दीपा त्याच्या हातात बंदूक देऊन स्वतःवर गोळी झाडण्यास सांगणार आहे. त्यामुळे आपला प्लॅन दीपाच्या लक्षात आला हे आता कार्तिकला कळणार आहे.
कार्तिक-दीपाच्या नात्याची नव्याने सुरुवात?
'रंग माझा वेगळा' या मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दीपा बंदूक देत म्हणत आहे,"हे घे... मार मला...तुला माझ्यावर सूड उगवायचा होता ना..त्यासाठीच कार्तिक तू मला वेडं ठरवत होतास ना... मारुन टाक मला...मार ना... त्यानंतर कार्तिक बंदूक उचलतो आणि दीपाच्या कपाळावर ठेवतो. पण लगेचच तो गोळी न मारता तिच्या पायाजवळ बसतो. त्यावेळी दीपा म्हणत आहे,"मला माहिती होतं, कार्तिकचं त्याच्या दीपावर खूप प्रेम आहे. त्या प्रेमामुळेच तू मला मारू शकला नाहीस.
कार्तिक आता दीपाचा जीव घेणार की, तिची माफी मागून पुन्हा एकदा नव्याने आपलं आयुष्य सुरू करणार का? हे 'रंग माझा वेगळा' या मालिकेच्या आगामी भागांमधून प्रेक्षकांना कळेल. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागांची मालिकाप्रेमींना आता उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या