(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिकेत नवा ट्विस्ट; कार्तिकला धडा शिकवण्यासाठी दीपा सज्ज
Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. दीपा आता कार्तिकला धडा शिकवणार आहे.
Rang Maza Vegla Marathi Serial Latest Update : 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील नव्या ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. दीपा आता कार्तिकला धडा शिकवणार आहे.
'रंग माझा वेगळा' या मालिकेने अप्लावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दीपा आणि कार्तिकची लव्हस्टोरी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. दीपाने सौंदर्याचा बदललेला दृष्टिकोन प्रेक्षकांनादेखील भावला. पण नंतर ही मालिका रटाळ झाली आणि या मालिकेने चौदा वर्षांची लीप घेतली.
'रंग माझा वेगळा'च्या प्रोमोने वेधलं लक्ष
'रंग माझा वेगळा' या मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये कार्तिक आणि दीपा टीव्ही बघताना दिसत आहेत. टीव्ही बघताना कार्तिक म्हणतोय,"या बायका किती वेड्या असतात. आपल्या नवऱ्यावर अगदी सहजपणे विश्वास ठेवतात. शेवटी काय झालं तिला मरावं लागलं". त्यावर दीपा म्हणते,"तिच्याजागी मी असते तर मी नवऱ्याचा हात पकडून त्यालाही खाली खेचलं असतं".
View this post on Instagram
दीपाच्या या वाक्याने कार्तिकला मोठा धक्का बसला आहे. याआधी कधीही दीपा अशाप्रकारे बोललेली नाही. त्यामुळे अचानक ती असं कसं बोलली असा प्रश्न कार्तिकला पडला आहे. मालिकेत आलेला हा ट्विस्ट प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा आहे. तसेच टीआरपीवरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे. या ट्विस्टमुळे टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका पुन्हा एकदा बाजी मारू शकते.
'रंग माझा वेगळा' मालिकेत पुन्हा गोडवा येणार
कार्तिकला तुरुंगवास भोगावा लागला होता. पण नंतर तो बाहेर आला तेव्हा तो दीपाच्या विरोधात वेगवेगळे कारस्थानं करू लागला. दीपाला वेडं ठरवण्यासाठी तो वेगवेगळे प्रयत्न करू लागला. बदला घेण्यासाठी तो तिला वाईट ठरवू लागला. पण आता मालिकेत पुन्हा एकदा गोडवा येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
'रंग माझा वेगळा' ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत असली तरी मालिकेतील रडगाण्याला प्रेक्षक मात्र कंटाळले आहेत. अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या या मालिकेचा टीआरपी आता घसरला आहे.
संबंधित बातम्या