Rang Majha Vegla : ‘मी नेहमी खरं बोलते, पण तू मात्र खोटं बोललीस’, कार्तिकी दीपावर संतापली!
Rang Majha Vegla : कार्तिक हाच कार्तिकीचा बाबा असल्याचं सत्य दीपाने बऱ्याच काळापासून लपवून ठेवलं होतं. मात्र, आता कार्तिकीला हे सत्य कळलं आहे.
Rang Majha Vegla : स्टार प्रवाहाच्या ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) या मालिकेने सध्या मोठं वळण घेतलं आहे. या मालिकेत सध्या बरेच ट्वीस्ट आणि टर्न पाहायला मिळत आहेत. चिमुकल्या दीपिका आणि कार्तिक सध्या त्यांच्या आई-वडीलांच्या शोधात आहेत. मात्र, आता कार्तिकीला तिच्या वडिलांबद्दलचं सत्य कळलं आहे. इतकी वर्ष दीपाने लपवून ठेवलेलं सत्य अखेर चिमुकल्या कार्तिकीसमोर आलं आहे.
कार्तिक हाच कार्तिकीचा बाबा असल्याचं सत्य दीपाने बऱ्याच काळापासून लपवून ठेवलं होतं. मात्र, आता कार्तिकीला हे सत्य कळलं आहे. दीपा आणि सौंदर्याचं बोलणं दाराशी उभ्या असलेल्या कार्तिकीच्या कानावर पडलं आहे. मात्र, हे सत्य ऐकून आता चिमुकल्या कार्तिकीच्या मनावर मोठा आघात झाला आहे. यावर तिने आपल्या आईला जाब विचारला आहे.
कार्तिकीला कळणार कार्तिक आपला बाबा असल्याचं सत्य!
सौंदर्या दीपाला पुन्हा घरी चल, अशी विनवणी करत असते. इतक्यात कार्तिकी शाळेतून परत घरी येते आणि आजीला घरात पाहून दाराशीच थांबते. यावेळी दीपा सौंदर्याला सांगते की, मी आणि कार्तिक आता पुन्हा कधीच एकत्र येऊ शकणार नाही. यावर सौंदर्या म्हणते, ‘तुम्ही एकत्र आलात अत्र, कार्तिकीला तिचा हक्काचा स्वतःचा बाबा मिळेल.’ यावर दीपा त्यांना विनवणी करते की, काहीही झालं तरी कार्तिक हाच कार्तिकीचा बाबा आहे, हे सत्य तिला कधीच सांगू नका. इतकी वर्ष कार्तिकी तिच्या बाबांबद्दल विचारतेय, तरीही मी या गोष्टी तिला सांगितलेल्या नाहीत.
कार्तिकी दीपाला करणार विनंती
सौंदर्या घरातून निघून गेल्यावर कार्तिकी घरात आली. मात्र, आल्यानंतर तिचं रूप पाहून दीपा देखील दचकली. चिडलेली कार्तिकी दीपाला म्हणाली, दीपिकाचा डॅडाच माझा बाबा आहे, हे मला कळलं आहे. इतकं बोलून ती दीपाने लपवलेला लग्नाचा अल्बम बाहेर काढते आणि दीपा-कार्तिकचं लग्न झालंय हे आपल्याला माहित असल्याचं सांगते. हे ऐकून दीपालाही धक्का बसतो. तू एकदाच मला सांग की डॉक्टर फ्रेंडच माझे बाबा आहेत. अशी विनवणी कार्तिकी दीपाला करते. आता दीपा हे कबुल करणार का? आणि कार्तिकी दीपिका आणि कार्तिकला हे सत्य सांगणार का? याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :