Majha Katta : छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम पुन्हा 'हवा येऊ द्या'मध्ये दिसणार? निलेश साबळेच्या उत्तराने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या
Majha Katta : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात पुन्हा दिसणार का यावर निलेश साबळेने 'माझा कट्टा' या कार्यक्रमात खुलासा केला आहे.
Nilesh Sabale on Chala Hawa Yeu dya : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. सलग 10 वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर या कार्यक्रमाने ब्रेक घेतला. पण हा कार्यक्रम संपताना प्रेक्षकही बरेच नाराज दिसले. त्यातच कार्यक्रम बंद होण्याआधीच या कार्यक्रमाचा कॅप्टन ऑफ द शिप म्हणजेच डॉ. निलेश साबळे (Nilesh Sable) याने कार्यक्रम सोडला. पण जर पुन्हा कार्यक्रम सुरु झाल्यास त्यात दिसणार का यावर निलेशने माझा कट्टामध्ये भाष्य केलं आहे.
चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम बंद झाल्यानंतर निलेश साबळे आणि भाऊ कदम यांची जोडगोळी कलर्स मराठी वाहिनीवरील हसताय ना हसायलाच पाहिजे या नव्या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच निमित्ताने डॉ.निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांनी माझा कट्टावर हजेरी लावली.
निलेश साबळे पुन्हा चला हवा येऊ द्या मध्ये दिसणार?
चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम बंद झाल्यानंतर तो लवकरच छोट्या ब्रेकनंतर परतणार असल्याची माहिती समोर आली होती. यावर माझा कट्टामध्ये जर चला हवा येऊ द्या छोट्या ब्रेकनंतर परतल्यास डॉ.साबळे आणि टीम आम्हाला पुन्हा दिसणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना निलेश साबळेने म्हटलं की, जर हवा येऊ द्या परत आलं तर त्या मी काम नाही करणार. कारण जेव्हा आपण एखादा सिनेमा वारंवार त्याच गोष्टीने करतो, तेव्हा त्याचा कंटाळा येतो. म्हणजे जर बाहुबली सिनेमाचा पहिला पार्ट आला त्यावर प्रेक्षक प्रेम करतील, दुसऱ्यावर करतील पण तिसऱ्या पार्टला प्रेक्षक कदाचित कंटाळून जातील. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच भूमिकेत आल्याने प्रेक्षक कंटाळतील होतील म्हणून मी पुन्हा हवा येऊ द्या करणार नाही.
छोट्या ब्रेकनंतर हवा येऊ द्या परतणार का?
छोट्या ब्रेक चला हवा येऊ द्या परतणार का यावर बोलताना निलेश साबळेने म्हटलं की, आम्हाला चॅनलकडून सांगण्यात आलं होतं की, जानेवारीमध्ये कार्यक्रम बंद करुन तो ऑगस्टमध्ये पुन्हा सुरु करायचा. पण आता तो सुरु होणार की याबाबत मला कल्पना नाही. त्यामुळे चला हवा येऊ द्या पुन्हा परतणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना अजूनही लागून राहिली आहे.