![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Marathi Serial Updates Bharat Ganeshpure : 'थुकरटवाडीच्या सरपंचा'चे कमबॅक! भारत गणेशपुरे 'या' मालिकेत साकारत आहेत भूमिका
Marathi Serial Updates Bharat Ganeshpure : 'चला हवा येऊ द्या'नंतर भारत गणेशपुरेंचे आता छोट्या पडद्यावर कमबॅक झाले आहे.
![Marathi Serial Updates Bharat Ganeshpure : 'थुकरटवाडीच्या सरपंचा'चे कमबॅक! भारत गणेशपुरे 'या' मालिकेत साकारत आहेत भूमिका Bharat Ganeshpure actor Marathi Serial Updates Bharat Ganeshpure come back after Chala Hawa Yeu Dya in marathi tv serial Shiva on Zee Marathi Marathi Serial Updates Bharat Ganeshpure : 'थुकरटवाडीच्या सरपंचा'चे कमबॅक! भारत गणेशपुरे 'या' मालिकेत साकारत आहेत भूमिका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/19/abd92c1de61c5f0ed1be13666c0506311713518213359290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bharat Ganeshpure : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा कॉमेडी शो बंद झाल्यानंतर या मालिकेतील कलाकारांनी नव्या वाटा निवडत वेगवेगळ्या मालिका, शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. काहींनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. छोट्या पडद्यावर धमाल उडवून देणाऱ्या या कलाकारांची त्यांच्या चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 'चला हवा येऊ द्या' नंतर भारत गणेशपुरेंचे (Bharat Ganeshpure) आता छोट्या पडद्यावर कमबॅक झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे भारत गणेशपुरे यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
भारत गणेशपुरेंचे कमबॅक
'चला हवा येऊ द्या' मध्ये भारत गणेशपुरे यांनी आपल्या विनोदी शैलीने आपला एक चाहता वर्ग निर्माण केला आहे. भारत गणेशपुरे यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत आपला ठसा उमटवला आहे. आता भारत गणेशपुरे यांची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली आहे. भारत गणेशपुरे हे झी मराठीवरील 'शिवा' या मालिकेत भूमिका साकारत आहेत.'शिवा' मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. त्या अनुषंगाने आता भारत गणेशपुरेची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
View this post on Instagram
'शिवा' मालिकेत कोणती भूमिका?
भारत गणेशपुरे हे 'शिवा' मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत आहेत. शिवा राहत असलेल्या वस्तीचा भाग ज्या प्रभागात येतो, त्याचे नगरसेवक म्हणून भारत गणेशपुरे दिसणार आहेत. या वस्तीमध्ये सध्या पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. मात्र, वस्तीमधील लोकांनी कोणतीही शहानिशा न करता कागदपत्रांवर सह्या केल्या आहेत. सह्या झालेली ही कागदपत्रे आता बिल्डरकडे जाणार आहेत. वस्तीचा पुनर्विकास करणारी बांधकाम कंपनी ही आशुतोषची कंपनी आहे. त्यामुळे या मालिकेत आता नवा रंजक वळण येणार आहे.
पाहुण्या कलाकाराची भूमिका?
भारत गणेशपुरे यांची 'शिवा' मालिकेत भूमिका किती लांबीची असणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, भारत गणेशपुरे साकारत असलेली व्यक्तीरेखा आणि मालिकेतील नव्या कथानकाचा भाग पाहता ही पाहुण्या कलाकाराची भूमिका असण्याची शक्यता आहे.
इतर संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)