Ashok Saraf : येत्या रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार 'बहुरूपी अशोक'
Ashok Saraf : यंदाचा रविवार प्रेक्षकांसाठी खास आहे. रविवारी प्रेक्षकांना 'बहुरूपी अशोक' हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.
![Ashok Saraf : येत्या रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार 'बहुरूपी अशोक' Next Sunday, viewers will get to see Bahurupi Ashok Ashok Saraf : येत्या रविवारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार 'बहुरूपी अशोक'](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/01/3a7f797670e645fa623a9caddf49b1b5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ashok Saraf : मराठी सिनेसृष्टीतील ‘मामा’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) सर्वांनाचं आपलेसे वाटतात. अशोक सराफ यांनी मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार सिनेमे दिले आहेत. त्यांना विनोदाचा बादशहा म्हणून ओळखलं जातं. अशोक सराफ यांनी नेहमीचं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली असून त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदाचा रविवार प्रेक्षकांसाठी खास आहे. रविवारी प्रेक्षकांना 'बहुरूपी अशोक' हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.
वयाचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाही त्यांच्यात असलेली ऊर्जा, त्यांच्यात असलेला दिलखुलासपणा, अचूक विनोदाचं टायमिंग, कामात असलेली स्थिरता, अभिनयाविषयी असलेलं प्रेम अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अशोक मामांचा हा यशस्वी प्रवास मोठ्या थाटामाटात एका सोहळ्याच्या रूपात साजरा करण्यात आला.
View this post on Instagram
सोहळ्यात अशोक मामांचे दिग्गजांकडून झालेले कौतुक आणि त्याच सोबत काही रंजक सादरीकरणदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळतील. या सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. जितेंद्रजी, एकता कपूर, सुनील गावस्कर यांनी देखील उपस्थिती दर्शवली.
कुठे पाहायला मिळेल ? रविवार 3 जुलै संध्याकाळी सात वाजता झी मराठीवर
संबंधित बातम्या
Ashok Saraf : कलाकारांच्या मदतीसाठी वापरला जाणार 'मी बहुरूपी' पुस्तकाचा निधी; निवेदिता सराफ यांनी केली घोषणा
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सुभाष सराफ सांगणार अशोक मामांचे मजेशीर किस्से
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)