Namrata Sambherao: घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीबाबत नम्रता संभेरावनं शेअर केली पोस्ट; म्हणाली, "सुखाचा प्रवास कसा होईल .."
Namrata Sambherao: नुकतीच नम्रतानं घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीबाबत एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
Namrata Sambherao: महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) ही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करते. नुकतीच नम्रतानं घोडबंदर रोडवरील (Ghodbunder Road) वाहतूक कोंडीबाबत एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
नम्रता संभेरावची पोस्ट
फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये नम्रतानं लिहिलं, "काय करायचं घोडबंदर रोडचं , लोडेड ट्रक टेम्पो पलटी होतायत साधारण रोजचा प्रवास असल्याने मी सांगू शकते, किमान 95 टक्के प्रमाण आहे. बरं नेमका प्रकार काय घडलाय त्याचा ही थांगपत्ता लागत नाही कारण कधीकधी विनाकारण ट्रॅफिक लागतं त्यामुळे हातावर हात धरून बसणे एवढाच पर्याय. सुखसोयी असलेले मोठमोठाले टॉवर झालेत खरं पण सुखाचा प्रवास कसा होईल ह्याची पण काळजी घ्यायला हवी. मेट्रोचं काम चालू आहे पण ती सुद्धा गायमुख पर्यंत जिथून खरं पुढे ट्रॅफिकला सुरुवात होते. अर्ध्या तासाच्या रस्त्याला 2 ते 3 तास लागतात. काय होऊ शकतं यावर"
नम्रताच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'आता तिथेच 11 वाजता मी एकच ठिकाणी 30 मिनिटे उभा होतो. लोकांच्या सहनशीलतेचा आंत किती वेळ बघणार देव जाणे. चंद्रावर मंगळावर जा, पाठवा बुलेट ट्रेन. मोठ- मोठे प्रोजेक्ट जरा बाजूला ठेवून बेसिक रोड जे रोजची गरज आहे ते तरी सामान्य जनतेसाठी नीट करा.'
वाळवी, व्हेंटिलेटर या चित्रपटांमध्ये नम्रता संभेरावनं काम केलं आहे. नम्रता ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवते. नम्रताच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील कॉमेडी स्टाईलला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील तिच्या लॉली या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
View this post on Instagram
नम्रता संभेरावसोबतच समीर चौघुले, गौरव मोरे आणि प्रसाद खांडेकर या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
इतर महत्वाच्या बातम्या: