एक्स्प्लोर
ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेते शिशिर शर्मा यांनी फेसबुकद्वारे रीता भादुरी यांच्या निधनाची माहिती दिली.
मुंबई : टीव्हीवरील 'निमकी मुखिया' मालिकेत इमरती देवीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रीता भादुरी यांचं आज (17 जुलै) निधन झालं. मागील दहा दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील सुजय रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. किडनी निकामी झाल्याने त्यांचं वयाच्या 62 व्या वर्षी निधन झालं.
ज्येष्ठ अभिनेते शिशिर शर्मा यांनी फेसबुकद्वारे रीता भादुरी यांच्या निधनाची माहिती दिली. "मला सांगताना अतिशय दु:ख होत आहे की, रीता भादुरी आपल्यात राहिल्या नाहीत. 17 जुलै रोजी दुपारी 12 वाजता मुंबईतील अंधेरी इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. त्या आमच्यासाठी आईप्रमाणे होत्या. तू कायमच आमच्या स्मरणात राहशील, मां," अशी त्यांची पोस्ट आहे.
साराभाई व्हर्सेस साराभाई, अमानत, एक नई पहचान आणि बायबल की कहानियां या मालिकांसह रीता भादुरी यांनी अनेक चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्यांनी हिंदीसह गुजराती चित्रपटसृष्टीतही काम केलं होतं. त्यांच्या निधनामुळे कुटुंबासह, मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत
मुंबई
Advertisement