Mrunal Dusanis: 'माझीया प्रियाला प्रित कळेना' ते 'तू तिथे मी', मृणाल दुसानिसनं हिट मालिकांमध्ये केलं काम, आता अभिनय क्षेत्रामधून ब्रेक घेऊन राहते परदेशात
मृणाल ही तिच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
Mrunal Dusanis: मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) ही सोशल मीडियावर तिच्या फॉरेन ट्रीप्सचे फोटो शेअर करत असते. मृणालनं अनेक हिट मालिकांमध्ये काम केलं आहे. पण मृणालनं सध्या अभिनय क्षेत्रामधून ब्रेक घेतला असून ती तिच्या मुलीसोबत वेळ घालवत आहे. मृणाल ही तिच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मृणालच्या मालिकांबद्दल आणि मृणालच्या मुलीबद्दल जाणून घेऊयात...
मृणालनं या मालिकांमध्ये केलं काम
मृणालनं 2010 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेमध्ये काम केलं. या मालिकेत तिनं साकारलेल्या शमिका या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यानंतर तिनं तू तिथे मी या मालिकांमध्ये देखील काम केलं. या मालिकांमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच श्रीमंत दामोदर पंत या चित्रपटात तिनं काम केलं. त्यानंतर 2015 मध्ये अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेमध्ये मृणालनं काम केलं. 2016 मध्ये मृणालनं निरज मोरेसोबत लग्न केलं. त्यानंतर मृणालनं अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेतला होता. नंतर तिनं 2018 मध्ये 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकेमधून तिनं कमबॅक केलं. 2018 ते 2020 दरम्यान या मालिकेनं प्रेक्षकांचे मनोरंजन केलं.
View this post on Instagram
2020 नंतर मृणालनं कोणत्याही मालिका किंवा चित्रपटामध्ये काम केलं नाही. 2022 मध्ये मृणालनं एका गोंडस मुलीला जन्म दिला. मृणालनं तिच्या मुलीचं नाव नुरवी असं ठेवलं आहे. सध्या मृणाल ही तिच्या कुटुंबासोबत अमेरिकेतील टेक्सास या राज्यातील डॅलस या शहरात राहते. मृणाल ही तिच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. मृणाल ही काही महिन्यांपूर्वी तिच्या कुटुंबासोबत हवाई येथे ट्रीपला गेली होती. या ट्रीपचे फोटो मृणालनं सोशल मीडियावर शेअर केले होते. मृणालनं शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसला कन्यारत्न, पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी