एक्स्प्लोर
'बिग बॉस 12' मधून मेघा धाडे आऊट!
मेघाने वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून 36 व्या दिवशी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. मात्र ग्रँड फिनालेला अवघे काही दिवस बाकी असतानाच (83 व्या दिवशी) तिचं एलिमिनेशन झालं.
मुंबई : बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचं विजेतेपद पटकावल्यानंतर अभिनेत्री मेघा धाडेने बिग बॉस हिंदीच्या बाराव्या पर्वात दमदार एन्ट्री घेतली. मात्र या आठवड्यात मेघा 'बिग बॉस 12'मधून आऊट झाली.
गेल्या आठवड्यात कोणाचंही एलिमिनेशन करणार नसल्याचं सांगत सलमान खानने स्पर्धकांना सुखद धक्का दिला होता. मात्र यावेळी त्याहून मोठा धक्का मिळाला तो दुहेरी एलिमिनेशनच्या स्वरुपात. या आठवड्यात जसलीन मथरु आणि मेघा अशा दोघींना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
मेघाने वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून 36 व्या दिवशी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला होता. मात्र ग्रँड फिनालेला अवघे काही दिवस बाकी असतानाच (83 व्या दिवशी) तिचं एलिमिनेशन झालं.
यापूर्वी मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेने 'बिग बॉस 12'मध्ये प्रवेश केला होता. मात्र महिन्याभराच्या आतच तिला घराबाहेर पडावं लागलं. त्यानंतर आठवड्याभरातच मेघाला वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली.
हिंदी बिग बॉसला महाराष्ट्रात विशेषत: मराठी प्रेक्षकांची म्हणावी तशी पसंती मिळाली नव्हती. शिवाय मराठी प्रेक्षकांमध्ये बिग बॉसची चर्चाही नव्हती. दुसरीकडे, मराठी बिग बॉसमुळे मेघा घराघरात पोहोचली होती. तिची लोकप्रियता एन्कॅश करण्यासाठी हिंदी बिग बॉसने मेघाला एन्ट्री दिल्याची चर्चा होती.
'विचित्र जोड्या' अशी यंदाच्या बिग बॉसची थीम असून सेलिब्रेटींसह सामान्य नागरिकांचाही या पर्वात समावेश आहे. सहा जोड्या आणि पाच सोलो स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवलं होतं. बिग बॉसच्या घरात आठ स्पर्धक उरले आहेत. यामध्ये करणवीर बोहरा, दीपिका कक्कर, श्रीशांत या सेलिब्रेटींचा समावेश आहे.
भजनसम्राट अनुप जलोटा आणि जसलीन मथरु जोडीने बिग बॉसच्या घरात गेल्याने त्यांच्या अफेअरची चर्चा सुरु होती, मात्र जलोटांनी एलिमिनेशननंतर या चर्चा धुडकावून लावल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
कोल्हापूर
राजकारण
विश्व
Advertisement